Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » यशवंत पंचायतराज अभियानात संगमनेर पंचायत समिती तृतीय
प्रशासन

यशवंत पंचायतराज अभियानात संगमनेर पंचायत समिती तृतीय

पंचायत राज दिनी होणार वितरण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत सन २०२२-२३ अंतर्गत नाशिक विभागात संगमनेर पंचायत समितीला उत्कृष्ट कामगिरीबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी यशवंत पंचायतराज अभियान राबविण्यात येते. नाशिक विभागस्तरीय समितीने पंचायत समितीला भेट देऊन सर्व विषयांची पडताळणी केली. सन २०२१- २२ च्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले. यासाठी एकूण ४०० गुणांची प्रश्रावली निश्चित करण्यात आली होती. त्यामध्ये पंचायत समितीचे सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम, पाणीपुरवठा, ग्रामपंचायत विभाग, तसेच शिक्षण, आरोग्य, महिला बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, विभाग तसेच शाक्षत विकास ध्येये अशा विविध विभागांची पडताळणी करून गुणांकन देण्यात आले.

पंचायत समितीस 400 पैकी 328.42. एवढे गुणांकन प्राप्त होऊन नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे,जळगाव, नंदुरबार या पाच जिल्हयातील सर्व तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

महाआवास अभियानात संगमनेर तालुक्याने उत्कृष्ट यश संपादन केले आहे. तसेच सुसज्ज इमारत, डेमो हाऊस, वृक्षारोपण, इंटरनेट सुविधा, पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृहे, महिला कक्ष आदी सोयीसुविधा यामुळे पंचायत समितीचा चेहरामोहरा बदलल्याचे चित्र दिसून येत आहे. अधिकाधिक कामात पारदर्शकता व गतीमानता आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. पंचायत समितीने आपली वेगळी व सकारात्मक प्रतिमा निर्माण केली आहे. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे यांच्या कार्यतत्परता व नियोजनबद्ध प्रशासन, अधिक लोकाभिमुख दृष्टिकोन, सामाजिक जाणीव , सहकार्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे.

पंचायत समितीला शासनातर्फे रक्कम रु ६ लक्ष, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्राप्त होणार आहे. पुढील महिन्यात पंचायत राज दिनी सदर पुरस्काराचे वितरण कार्यक्रमात संगमनेर पंचायत समितीला सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

पंचायत समितीतील विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी यांनी स्वत:ला झोकून देऊन काम केले आहे.आपली जबाबदारी पार पाडत असताना शासनाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहे. सामाजिक जाणिवेतून काम केल्याने हे यश मिळाले. वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले आहे. यापुढे अधिक लोकाभिमुख कारभार करत सामान्य जनतेच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला जाईल. या यशात पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांचा विशेष सहभाग राहिला आहे.
अनिल नागणे, गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 418
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.