Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘आरोपी अजूनही त्रास देतोय का?’ पीडित महिलांना पोलिसांचा फोन जाताच उघड झाली ‘ही’ मोठी माहिती

19/10/2026

बंधाऱ्यावरून तरुणाची पाण्यात उडी; दुचाकी अन् मोबाईलमुळे उघडकीस आली थरारक घटना

19/10/2026

स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अपूर्णच! तरुणीचा टोकाचा निर्णय, परिसरात हळहळ

19/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महात्मा फुले जन आरोग्य योजना ठरली रूग्णांसाठी ‘जीवनदायी’, शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये ५ वर्षात १८ हजार रूग्णांवर उपचार… १०९ कोटी ४८ लाख विमा रक्कमेची प्रतिपूर्ती!
आरोग्य

महात्मा फुले जन आरोग्य योजना ठरली रूग्णांसाठी ‘जीवनदायी’, शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये ५ वर्षात १८ हजार रूग्णांवर उपचार… १०९ कोटी ४८ लाख विमा रक्कमेची प्रतिपूर्ती!

विशेष वृत्त लेखन: उप माहिती कार्यालय, शिर्डी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/03/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था या संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमधील रूग्णांसाठी महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना ‘जीवनदायी’ ठरली आहे. या योजनेत २०१७ ते २०२२ या मागील पाच वर्षात १८ हजार ८२३ रूग्णांवर उपचार करण्यात आले. या उपचारांच्या खर्चापोटी शासनाकडून रूग्णालयास १०९ कोटी ४८ लाख ४२ हजार रूपयांच्या विमा रक्कमेची प्रतिपूर्ती करण्यात आली आहे, अशी माहिती रूग्णालयाचे प्रभारी उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी दिली.

तळागाळातील श्रमजीवी असो वा, मध्यमवर्गीय कुटुंबीय असो, आरोग्यविषयक प्रश्न उद्भवल्यास खर्चाचा प्रश्न उभा राहतो. अनेक आजारांवरील औषधोपचाराचा खर्च प्रचंड आहे. दिवसागणिक होणाऱ्या खर्चाचे आकडे हजार ते लाखाच्या घरात पोहोचतात. अनेक कुटुंबांच्या आवाक्याबाहेरील तो खर्च आहे. ही बाब लक्षात घेऊन नोव्हेंबर २०१३ पासून राज्यशासनाने ‘राजीव गांधी योजना’ सुरू केली. २०२० या योजनेचे ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ असे नामांतर करत ती नव्याने कार्यान्वित करण्यात आली.

विमा कंपनीकडून उपचाराचे पूर्ण देयक मिळत असल्याने रुग्णालयांना नातेवाईकांकडून एकही रुपया घेता येत नाही. त्यामुळे ही योजना श्री साईबाबा रूग्णालयात येणाऱ्या आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी वरदान व जीवनदायी ठरत आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेवरील एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबीयांतील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रतिवर्षी विम्याचा हप्ता शासनामार्फत अदा केला जातो. तसेच प्रतिवर्षी दीड लाख रुपयांची हमी दिली जात आहे.

या योजने अंतर्गत बाराशे आजारांवर उपचार केले जातात. १२७ सेवांची फेरतपासणी उपचारांचा लाभ घेता येतो व ३१ विशेष सेवांचा समावेश करण्यात येतो आणि रूग्णांना सर्व सेवा नि:शुल्क दिल्या जातात. विमा रक्कमेच्या मर्यादेत कुटूंबातील सर्व व्यक्तींना याचा लाभ घेता येतो.

या योजनेत श्री साईबाबा रूग्णालयांत २०१७-१८ या वर्षात ४५६७ रूग्णांवर उपचारापोटी २९ कोटी २० लाख ४४ हजार ८०३ रूपये, २०१८-१९ या वर्षात ३९३८ रूग्णांवर उपचारापोटी २८ कोटी ८२ लाख ७८ हजार २६६ रूपये, २०१९-२० या वर्षात ४५१४ रूग्णांवर उपचारापोटी २२ कोटी ५७ लाख ७१ हजार ४१५ रूपये, २०२०-२१ या वर्षात २३२९ रूग्णांवर उपचारापोटी १३ कोटी ९९ लाख ८२ हजार ७९८ रूपये व २०२१-२२ या वर्षात ३४७५ रूग्णांवर उपचारापोटी १४ कोटी ८७ लाख ६४ हजार ७५७ रूपयांच्या विमा रक्कमेची प्रतिपूर्ती करण्यात आली.

‘‘महात्मा फुले योजनेत माझी हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. खासगी रूग्णालयातील खर्च परवडणारा नव्हता म्हणून साईबाबा रूग्णालयात उपचार घेतले. येथील आरोग्य सुविधा सुसज्ज आहेत. यामुळे मला नवीन जीवन ‍मिळाले.’’ अशी प्रतिक्रिया नाशिकमधील येवला तालुक्यातील अंदरसूल येथील रतन रानोबा गायकवाड यांनी दिली आहे.

‘‘महात्मा फुले योजनेत माझी व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (valve replacement) शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे आज मी अधिक सुदृढ आयुष्य जगत आहे. गोर-गरीब रूग्णांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना वरदान आहे. अशी प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेलोना येथील शांताबाई प्रकाश कोल्हे यांनी दिली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे…

• रेशन कार्ड (पिवळे, केशरी, अन्तोदय, अन्नपूर्णा)
• पांढरे रेशनकार्ड व ७/१२ उतारा (शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी)
• ओळखपत्र : आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक व इतर शासनमान्य ओळखपत्र
• लहान मुलासाठी (६ वर्ष वयापेक्षा कमी) जन्माचा दाखला, आई किंवा वडिलांचे ओळखपत्र.
• फाटलेले रेशन कार्ड किंवा रेशन कार्ड मध्ये त्रुटी असतील तर तहसिलदाराचे प्रमाणपत्र किंवा दुय्यम शिधापत्रिका

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 404
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘आरोपी अजूनही त्रास देतोय का?’ पीडित महिलांना पोलिसांचा फोन जाताच उघड झाली ‘ही’ मोठी माहिती

By Annant Ppangarkar19/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्त्री शक्तीचा जागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या काळात महिला आणि मुलींच्या…

बंधाऱ्यावरून तरुणाची पाण्यात उडी; दुचाकी अन् मोबाईलमुळे उघडकीस आली थरारक घटना

19/10/2026

स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अपूर्णच! तरुणीचा टोकाचा निर्णय, परिसरात हळहळ

19/10/2026

आज सोमवार, १९ ऑक्टोंबर — काय सांगतो तुमचा आजचा दिवस बघा राशीनुसार

19/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.