महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या नव्या पोलीस निरीक्षकांना खात्रीशीर माहिती मिळाली आणि त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी छापा टाकण्यासाठी पाठविले. पथकाने छापा टाकला आणि साडेआठशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना घुलेवाडी गावामध्ये महात्मा फुले शाळेजवळ एका टपरीच्या आडोशाला एक व्यक्ती मटक्याचे आकडे घेत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षकांनी याची माहिती पोलीस कर्मचारी रामकिसन मुकरे, आरवडे, खताळ यांना देत छापा टाकण्याचे आदेश दिले.
पथकाने घुलेवाडीतील महात्मा फुले शाळेजवळ एका टपरीच्या आडोशाला छापा टाकला असता तेथे दत्ता वसंत जाधव नावाचा एक इसम पांढऱ्या कागदावर पेनने आकडे लिहीत होता. पोलिसांनी त्याची अंग झळती घेतली असता त्याच्या ताब्यात बॉलपेन ने आकडे लिहिलेले एक पांढऱ्या रंगाचे पुस्तक आणि साडेआठशे रुपये रोख असा मुद्देमाल आढळून आला.
कल्याण मटका नावाचा जुगार पैशावर खेळविताना आढळून आलेल्या जाधव याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक आरवडे करत आहे.

