Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात डॉक्टरला लोखंडी रॉडने मारहाण पायाचा गुडघा फ्रॅक्चर; गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरात डॉक्टरला लोखंडी रॉडने मारहाण पायाचा गुडघा फ्रॅक्चर; गुन्हा दाखल

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 19, 2023Updated:March 19, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
संस्था आणि बँकेच्या व्यवहारावरून संगमनेरमध्ये एका डॉक्टरला चौघा जणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार शहरातील लिंक रोड भागात घडला असून या मारहाणीत डॉक्टरच्या पायाच्या गुडघा फ्रॅक्चर झाला आहे. संबंधित डॉक्टरवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत खोपट (ठाणे) येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. वसीम करीम तांबोळी यांनी उपचारादरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्यात रईश अहमद शेख बेपारी, अदनान मन्सूर बेपारी, जुबेर आयुब सय्यद आणि फिरोज गुलाब बागवान यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांबोळी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे कुटुंबीय समनापुर येथे राहत असून त्यांच्या वडिलांनी अलाईड एज्युकेशन सोसायटी समनापुर अंतर्गत नॅशनल इंग्लिश स्कूल संगमनेर या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेचे सर्व व्यवहार माझ्या नावावर होतात. या अनुषंगाने रईश अहमद शेख (बेपारी) याने आमच्या संस्थेत फेरफार केल्याने न्यायालयात दिवानी दावे दाखल केलेले आहेत. लिंक रोड येथील एचडीएफसी बँकेत असलेल्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या खात्यातून सात लाख रुपये १६ मार्चला काढल्यासंबंधी माहिती समजली.

त्यामुळे शुक्रवारी (१७ मार्च) डॉ. तांबोळी भाऊ कासिम आणि चुलते नजीर इस्माईल तांबोळी यांच्यासोबत एचडीएफसी बँकेत शाळेच्या खात्यावरील रकमे संदर्भात चौकशी करण्याकरिता आले होते. बँक व्यवस्थापकाशी चर्चा करत असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रईश अहमद शेख हा तेथे आला व मी ते पैसे काढले असून सध्या सदर खाते माझ्या नावावर आहे. मी भाऊ व चुलता यांना समजावून सांगत असताना त्याचा राग येऊन त्याने आम्हाला शिवीगाळ केली व मला धक्काबुक्की करीत बँकेबाहेर ओढत घेऊन आला.

त्यावेळी तेथे अदनान मन्सूर बेपारी, जुबेर आयुब सय्यद आणि फिरोज गुलाब बागवान यांनी मला शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. यावेळी भाऊ आणि चुलते मला सोडविण्यास आले असताना त्यांना देखील शिवीगाळ व लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. त्यादरम्यान माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर रईश अहमद शेख (बेपारी) याने लोखंडी रॉडने जोरात मारले. त्यामुळे डॉक्टर तांबोळी यांच्या डाव्या पायाचा गुडघा फ्रॅक्चर झाला अशा आशयाच्या जबाबावरून चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,073
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 18, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आनंद आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. वैवाहिक…

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.