Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महसूल मंत्री विखेंच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील १९,१२३ लाभार्थ्यांना मार्चअखेर १ कोटी ५३ लाख २४ हजार रुपयांचे अनुदान मंजुर
प्रशासन

महसूल मंत्री विखेंच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील १९,१२३ लाभार्थ्यांना मार्चअखेर १ कोटी ५३ लाख २४ हजार रुपयांचे अनुदान मंजुर

अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर :
राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून सुरु असलेल्‍या विविध व्‍यक्तिगत लाभाच्‍या योजनांपोटी संगमनेर तालुक्‍यातील १९ हजार १२३ लाभार्थ्‍यांना मार्च २०२३ अखेर १ कोटी ५३ लाख २४ हजार रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या विशेष प्रयत्‍नांमुळे हे अनुदान लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍यात वर्ग झाले आहे.

राज्‍य शासनाच्‍या माध्‍यमातून विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी केली जाते. सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय दिव्‍यांग निवृत्‍ती वेतन योजना, राष्‍ट्रीय कुटूंबलाभ योजना अशा योजनांचा यामध्‍ये समावेश आहे.

तालुक्‍यातील सुमारे १९ हजार १२३ लाभार्थ्‍यांनी योजनांचा लाभ मिळावा म्‍हणून प्रस्‍ताव दाखल केले होते. या प्रस्‍तावांना नुकतीच मंजुरी मिळाली असून, पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी हे अनुदान लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍यात वर्ग करण्‍याच्‍या सुचना प्रशासनास दिल्‍या होत्‍या. त्‍याप्रमाणे १९ हजार १२३ लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍यात सुमारे १ कोटी ५३ लाख ५४ हजार ६०० रुपयांचे अनुदान वर्ग झाले आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेत सर्व साधारण ४५७३ लाभार्थ्‍यांना ४६ लाख ३२ हजार २०० रुपये, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जातीसाठी ५०० लाभार्थ्‍यांना ५ लाख ६ हजार २०० रुपये , संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमातीसाठी १६८ लाभार्थ्‍यांना १ लाख ७३ हजार ३०० रुपये, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना गट ब सर्वसाधारण व गट अ योजनेतील ८९०९ लाभार्थ्‍यांना ८१ लाख २८ हजार ९०० रुपये, श्रावणबाळ राज्‍य सेवा निवृत्‍ती वेतन योजना अनुसूचित जाती योजनेतील ६९३ लाभार्थ्‍यांना ६ लाख ९३ हजार रुपये, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन अनु जमाती योजनेतील ३२१ लाभार्थ्‍यांना ३ लाख २१ हजार रुपये, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील ३८२२ लाभार्थ्‍यांना ७ लाख ७९ हजार २०० रुपये, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍ती वेतन योजनेतील २०१ लाभार्थ्‍यांना ६० हजार ३००, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय दिव्‍यांग निवृती वेतन योजनेतील ३५ लाभार्थ्‍यांना १० हजार ५०० रुपये, राष्‍ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील १ लाभार्थ्‍याला २० हजार रुपये प्राप्‍त झाले आहे.

सदर योजनांचे अनुदान लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍यात वर्ग करण्‍यासाठी पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलेल्‍या सहकार्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, अमोल खताळ, भाजयुमोचे शैलेश फटांगरे, सरपंच संदिप देशमुख, कोल्‍हेवाडीच्‍या सरपंच सुवर्णा दि‍घे, जोर्वेच्या सरपंच प्रिती दिघे यांनी आभार मानले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 299
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.