Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १४१% वसुली करत संगमनेर महसूलचा नवा उच्चांक; गेल्या वर्षीपेक्षा सोळा टक्के अधिकची वसुली
प्रशासन

१४१% वसुली करत संगमनेर महसूलचा नवा उच्चांक; गेल्या वर्षीपेक्षा सोळा टक्के अधिकची वसुली

तहसीलदार अमोल निकम यांची माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
मावळत्या आर्थिक वर्षासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने संगमनेर तालुक्याला दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करतानाच तालुक्याने महसूल वसुलीचा नवा उच्चांक तयार केला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात संगमनेर तालुक्याची १४१% वसुली झाली असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेताना दिसत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी संगमनेर विभागाला १५ कोटी ६९ लक्ष रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ मार्च अखेर हे उद्दिष्ट ओलांडत संगमनेर तहसीलने तब्बल २२ कोटी २० लाख रुपयांची महसूल वसुली केली आहे. टक्केवारी मध्ये हा आकडा १४१% इतका आहे. गत आर्थिक वर्षात देखील संगमनेर तालुका महसूल विभागाने १२५% वसुली पूर्ण करण्यात यश मिळविले होते.

संगमनेर तालुका महसूल विभागाने यामुळे आपलाच गतवर्षीचा उच्चांक मोडीत काढला असून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्याचे कामगिरी सरस ठरली आहे. यामुळे जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या तिजोरीत देखील मोठ्या प्रमाणात पैसा जमा करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

जमीन महसूल वसुली अंतर्गत शेतसारा, बिनशेती सारा, अनधिकृत अकृषक कर, नजराणा प्रकरणे, मोबाईल टॉवर व इतर कर यामधून शासनाला ७ कोटी ७० लाख रुपये, गौणखनिज परवाने, विविध शासकीय विभाग रॉयल्टी रक्कम, अवैध गौण खनिज वाहतूक दंड इत्यादी माध्यमातून १४ कोटी ९३ लाख रुपये वसूल करण्यात आला असून या कराचा भरणा शासकीय तिजोरीत करण्यात आला आहे.

निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर, महसूल नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, शिरस्तेदार श्रीकांत लोमटे, अव्वल कारकून महेश खरपुडे, महसूल सहाय्यक अंजना पवार यांच्यासह तालुक्यातील तलाठी कोतवाल कार्यालयीन कर्मचारी यांच्या प्रयत्नातून उद्दिष्ट साध्य करण्यात महसूल प्रशासनाला यश आल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

☆
संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, वस्तुनिष्ठ नियोजन या बळावर यावर्षीचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात संगमनेर तालुक्याला यश मिळाले आहे.
अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 432
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.