Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला संगमनेरच्या न्यायालयाने ठोठावली जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा
न्यायालय

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला संगमनेरच्या न्यायालयाने ठोठावली जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/04/2023Updated:06/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
चारित्र्याचा संशय घेत पत्नीच्या डोक्यात पाटा टाकून तिचा खून केल्याप्रकरणी पतीस संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड द्रव्याची शिक्षा ठोठावली आहे. प्रकाश नामदेव धांडे, वय 36 वर्ष, रा. आंबेवंगण, ता. अकोले, जि. अहमदनगर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नांव आहे.

संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथे 12 नोव्हेंबर 2018 रोजी खुनाचा हा प्रकार घडला होता. आरोपी प्रकाश धांडे यांच्यावर पत्नी शांता हिच्या खुनाचा आरोप होता. या संदर्भात घारगाव (ता. संगमनेर) पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात मृत शांता धांडे हिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शांता हिचा मामेखेल येथील एका व्यक्तीशी पहिला विवाह झालेला होता. त्याच्याशी झालेल्या घटस्फोटानंतर तिचा दुसरा विवाह आंबेवंगण ता. अकोले येथील प्रकाश नामदेव धांडे यांच्यासोबत जवळे बाळेश्वर येथे झाला होता. लग्नानंतर हे दाम्पत्य श्रीगोंदा भागात एका होस्टेलवर काम करत होते. नवरा प्रकाश धांडे हा शांता हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. तसेच फिर्यादीची दुसरी मुलगी कांता हे पतीसह जवळे बाळेश्वर येथे राहत असून धांडे दाम्पत्य आपल्या साडूच्या घरी जवळ बाळेश्वर येथे आले होते. घटनेच्या दिवशी संध्याकाळी फिर्यादीचा जावई प्रकाश हा राजापूर येथे कामाचे राहिलेले पैसे आणण्यासाठी गेला होता. रात्री तो घरी आल्यानंतर सर्व कुटुंबियांनी एकत्रित जेवण केले. त्यानंतर 12 नोव्हेंबरच्या रात्री सर्व कुटुंबीय झोपले असता मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या दुसऱ्या मुलीने आरडाओरडा केल्याने सर्वजण जागे झाले. त्यावेळी शेजारच्या खोलीत फिर्यादीची दुसरी मुलगी शांता ही रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेली आढळून आली.

तिच्या डोक्यामध्ये पाटा टाकून तिचा खून करण्यात आला होता. यावेळी फिर्यादीचा जावई प्रकाश हा तेथे आढळून आला नाही. त्यामुळे आपल्या मुलीचा खून झाल्याची तक्रार घारगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. घारगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे आणि उपनिरीक्षक योगेश मोहिते यांनी तपास करून आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती.

न्यायाधीश मनाठकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम बघितले. गवते यांनी या खटल्यात सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. यात फिर्यादी, फिर्यादीची मुलगी, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी अंबादास भुसारे, उपनिरीक्षक योगेश मोहिते यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाचा आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी प्रकाश धांडे याला दोषी ठरवत जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 594
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात अहिल्यानगर स्थानिक…

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.