महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सह्याद्री पतसंस्थेला ३१ मार्च अखेरीस १ कोटी १९ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती सह्याद्री पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश गुंजाळ यांनी दिली.
३१ मार्च २०२३ अखेर संस्थेकडे ३० कोटी ३४ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने २७ कोटी २४ लाख रुपयांचे सभासदांना कर्ज वाटप केले आहे. संस्थेचा राखीव निधी ६ कोटी ४९ लाख तर संस्थेचा स्वनिधी १ कोटी ३५ लाख रुपये आहे. संस्थेचे भाग भांडवल ७ कोटी ४१ लाख आहे. संस्थेची २० कोटी ११ लाख रुपये गुंतवणूक असून ३१ मार्च अखेर १ कोटी १९ लाख रुपये नफा झाला.
संस्थेमार्फत वर्षभर विवाह भेट योजना, कन्यादान योजना, सानुग्रह अनुदान, मयत सभासदाची संपूर्ण कर्ज माफी, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव अशा अनेक योजना सुरु असून सभासदांच्या उत्तम प्रतिसादामुळे व आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व सह्याद्री पतसंस्थेचे संचालक यांच्या मार्गदर्शनामुळे संस्था आर्थिकदृष्ट्या प्रगती पथावर आहे.

