Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » “वॉकेथॉन” चालण्याच्या स्पर्धेत ५०० स्पर्धकांचा सहभाग
आरोग्य

“वॉकेथॉन” चालण्याच्या स्पर्धेत ५०० स्पर्धकांचा सहभाग

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर, निमा संगमनेर आणि माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक, संगमनेर संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त “विन डायबेटीस भव्य वाकेथॉन (चालण्याची स्पर्धा) स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच या स्पर्धेत सहभाग घेऊन लायन्स क्लब राबवित असलेल्या विन डायबेटीज या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

वैज्ञानिक शास्त्रानुसार दैनंदिन ३ किलोमीटर चालल्याने मधुमेह असलेले रूग्ण त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात. समाजामध्ये चालण्याच्या व्यायामविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वय ३० वर्ष ते ९२ वर्ष वय असलेले स्पर्धेक सहभागी झाले होते. ५०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धकांना टी शर्ट, कॅप, मोफत रक्ततपासणी, एनर्जी ड्रिंक, मेडल, रोख पारितोषिक, प्रमाणपत्र देण्यात आले.

मधुसूदन नावंदर, सौ. कडलग, राजकिशोर कासट, सरला आसावा, विवेक कासार, सौ. परदेशी यांच्यासहित २१ जणांना पारितोषिके देण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एमजेएफ ला. गिरीश मालपाणी, ला. श्रीनिवास भंडारी, सफायर अध्यक्ष उमेश कासट, सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी, अतुल अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प प्रमुख ला. डॉ. अमोल कृ. वालझाडे, ला. सुदीप हासे, डॉ. विशाल ताम्हाणे, डॉ. सुशांत गिरी यांनी काम पाहिले तर ला. देविदास गोरे, ला. महेश डंग, ला.सुमित मणियार, माधवबाग क्लिनिक हेड डॉ. कल्पिता वालझाडे, निमा अध्यक्ष डॉ. विनायक नागरे, सचिव शरद गुंजाळ, ला. जितेश लोढा, हरमित डंग, ला. पुष्पा गोरे आणि सर्व लायन्स सदस्यांनी काम बघितले.

डॉ.विकास करंजेकर, डॉ. अमोद कर्पे, डॉ. सौरभ गीते, डॉ. सुभाष मंडलिक, डॉ. श्याम दुर्गुडे, डॉ. विपुल भुजबळ, डॉ. रविन चांडक, डॉ. संजय मेहता, डॉ.सुधाकर पेटकर, डॉ. निशांत इंगळे, डॉ. रविंद्र गुंजाळ, डॉ. अतुल देशमुख, डॉ. संदीप वामन, डॉ. संतोष खतोडे, डॉ. संदीप अरगडे, डॉ. किरण नेहे, डॉ. महेंद्र कोल्हे, डॉ. पांडुरंग जाधव, डॉ. निलेश सातपुते, डॉ. संगीता रसाळ, डॉ. शुभदा देशमुख, डॉ. भारती गुंजाळ, डॉ. पूनम कचेरिया, डॉ. वैशाली कुलकर्णी, डॉ. रुपाली ताम्हाणे, डॉ. रोहिणी करंजेकर, डॉ. खैरनार, डॉ. रुपाली जोंधळे, डॉ. सविता वामन, डॉ. विशाखा पाचोरे, डॉ. सुनीता राऊत, डॉ. मिर्झा या सर्व डाॅक्टर्सच्या टीमने या स्पर्धेसाठी मोलाची साथ दिली.

पुढील वर्षी स्पर्धेचे स्वरूप मोठे होणार
या स्पर्धेमध्ये संगमनेरमधील सर्व सामाजिक संस्थांनी आपला सहभाग नोंदविला. ९२ वर्षांच्या गृहस्थांनी ३ किलोमीटर पायी केलेला प्रवास सर्वांसाठी थक्क करणारा होता. महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. ५०० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाल्याने पुढील वर्षी या स्पर्धेचे स्वरूप मोठे करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 395
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात अहिल्यानगर स्थानिक…

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.