Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकारमहर्षी थोरात कारखान्याचे स्क्रॅप भागीदारीत घेतल्याच्या व्यवहारातून झालेल्या वादात तरुणाचे अपहरण
गुन्हेगारी

सहकारमहर्षी थोरात कारखान्याचे स्क्रॅप भागीदारीत घेतल्याच्या व्यवहारातून झालेल्या वादात तरुणाचे अपहरण

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या लोखंडी स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या दोघा व्यवसायिकांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाल्याने मुंबईच्या एका व्यापाऱ्याने संगमनेर येथील एका स्क्रॅप (लोखंडी भंगार) व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.

शनिवारी रात्री समनापुर येथील व्यापारी अश्फाक मुक्तार मलिक यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीवरून साबान अत्तर अली उर्फ बाबू (रा. तुर्भे, नवी मुंबई) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती की, अश्फाक मलिक यांचा समनापुर येथे मलिक स्टील नावाने लोखंडाचा व्यवसाय आहे. तसेच त्यांचा मोठा भाऊ मोबीन मुक्तार मलिक उर्फ सज्जू यांचा भंगार स्क्रॅपचा व्यवसाय आहे. त्यामुळे मोबीन मलिक आणि नवी मुंबई तुर्भे येथील साबान अत्तर अली उर्फ बाबू या दोघांनी एकत्रितरित्या संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात साखर कारखान्यामधील लोखंड (स्क्रॅप) संयुक्तपणे घेतले होते. व त्यामधून प्राप्त होणारे उत्पन्न त्या दोघांमध्ये वाटून घेतले जात होते. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारावरून वाद निर्माण झाला होता.

भाड्याने देणे आहे

१५ एप्रिलला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मलिक यांच्या लहान भावाने त्यांना फोन करून माहिती दिली की, मोबीन उर्फ सज्जू याची मोटरसायकल समनापुर मार्केट चौफुलीवर पडलेली आहे. त्यामुळे लगेचच मलिक त्यांच्या लहान भावांसह मोबीन उर्फ सजीव याचा शोध घेत असताना त्यांना माहिती मिळाली की, त्यांचा भाऊ त्याचा व्यवसाय पार्टनर साबान अत्तर अली उर्फ बाबू याच्यासोबत गेला की त्यास पळवून नेले याबाबत मला शंका वाटल्याने मलिक भावंडांनी आपल्या भावाचा दिवसभर शोध घेतला.

दरम्यानच्या काळात मलिक यांचा भाऊ मोबीन उर्फ सज्जू याने फोन करून तो बाबू याच्यासोबत असल्याचे सांगितले. भाऊ सज्जू आणि बाबू यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून जे व्यावसायिक तणाव निर्माण झाले होते त्या वादातूनच माझ्या भावास अज्ञात कारणासाठी पळवून नेले किंवा तो स्वतः त्यासोबत गेला याबाबत मला शंका असल्याने साबान अत्तर अली उर्फ बाबू याने मलिक यांच्या भावास व्यावसायिक भागीदारीतील वादामुळे अज्ञात कारणासाठी पळवून नेले असल्याची तक्रार शहर पोलिसांकडे केली.

मलिक यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी साबान अत्तर अली उर्फ बाबू याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश धादवड करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,433
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.