महाराष्ट्र संवाद न्यूज
पळशी वनकुटे ता. पारनेर येथील एका मेंढपाळाच्या अल्पवयीन पंधरा वर्षीय मुलीस काहीतरी अमिष दाखवत फुस लावून तिला पळवून नेल्याप्रकरणी नांदुरी दुमाला येथील शुभम प्रकाश कवडे यांच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (१८ एप्रिल) सकाळी नऊ वाजता संगमनेर तालुक्यातील कवठे धांदरफळ येथील पतंग बाबा मंदिराशेजारी असलेल्या शेतात हा प्रकार घडला असल्याचे पन्नास वर्षीय तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, लालू नन्हू घुले (वय ५० वर्षे, धंदा – मेंढपाळ, रा. पळशी वनकुटे, ता. पारनेर) हे हल्ली संगमनेर तालुक्यातील कवठे धांदरफळ येथे राहावयास आहेत. फिर्यादीच्या पंधरा वर्ष तीन महिन्यांची अल्पवयीन मुलीस शुभम प्रकाश कवडे याने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून फिर्यादीच्या संमतीशिवाय पळवून नेले आहे.
वगैरे मजकूरच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी कवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. बी. घोडे करीत आहेत.

