Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोणी जिल्हा परिषद शाळेचे बीओटी मॉडेल आता राज्यभर राबविणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
शिक्षण

लोणी जिल्हा परिषद शाळेचे बीओटी मॉडेल आता राज्यभर राबविणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

लोणी येथे बीओटी तत्त्वावर बांधलेल्या जिल्हा परिषद शाळा व व्यापारी संकुल इमारतीचे लोकार्पण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी, (महाराष्ट्र संवाद न्यूज)
‘‘लोणी जिल्हा परिषद शाळेची बीओटी तत्त्वावर सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. लोणी जिल्हा परिषद शाळेचे हे बीओटी मॉडेल राज्यभर राबविण्यात येईल.’’ अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

लोणी बु. येथे बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुल इमारतीचे लोकार्पण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के-पाटील, ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे-पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले, परदेशासारखे शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना मिळाले पाहिजे, यासाठी स्वर्गीय पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील व स्वर्गीय पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनी सहकाराबरोबर शिक्षण क्षेत्रात काम केले. तंत्रज्ञानातील शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना मिळावे, यासाठी बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्यातील पहिल्या खासगी आयटीआयची मुहूर्तमेढ लोणी येथे रोवली. यातून त्यांची शिक्षणविषयक दूरदृष्टी दिसून येते.

विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान व कौशल्य प्राप्त व्हावे. यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून कृषी हा विषय इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. शालेय शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे काम जिल्हा परिषद शाळा करत असतात. लोणी येथे ‘बांधा,वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्वावर बांधण्यात आलेली जिल्हा परिषद शाळा राज्यासाठी आदर्शवत आहे.

मंत्री विखे म्हणाले, लोणी परिसरात अध्‍यात्मिक वारसा जोपासण्याचे काम पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी केले. ग्रामीण शिक्षण, सहकार, कृषी व आरोग्याचा पाया मजबूत करण्याचे काम त्यांनी केले. आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,506
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.