Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यात मोठ्या प्रमाणात उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; संगमनेरला शैलेंद्र हिंगे नवे प्रांत
प्रशासन

राज्यात मोठ्या प्रमाणात उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; संगमनेरला शैलेंद्र हिंगे नवे प्रांत

डॉ. शशिकांत मंगरूळे नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत; बघा यादी राज्यात कोणाच्या झाल्या बदल्या...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/05/2023Updated:06/05/2023No Comments6 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज)
राज्यात मोठ्या प्रमाणात उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांचीदेखील बदली झाले आहे. त्यांना अद्याप नव्या नियुक्तीचे ठिकाण मिळाले नसून त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर वाशिम येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शैलेश हिंगे यांचे नियुक्ती झाली आहे.

मंगरुळे गेल्या चार वर्षापासून संगमनेर मध्ये कार्यरत होते गत विधानसभा निवडणुकीपासून संगमनेर मध्ये कार्यरत असलेल्या मंगरूळे यांचा येथील कार्यकाळ लौकिकास्पद ठरला आहे. विविध निवडणुकांसह कोरोना काळात त्यांनी केलेले काम लक्षवेधी ठरले होते.

बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अजित थोरबोले यांना दापोलीचे उपविभागीय अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.
श्रीमती ज्योती कावरे यांची उपमहाव्यवस्थापक (जमीन) महाराष्ट्र राज्य वखार मंडळ पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीगोंद्याचे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांचे सातारा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
श्रीमती पल्लवी निर्मळ जिल्हा पुनर्वसन अधिकारी अहमदनगर येथून विशेष भूसंपादन अधिकारी अहमदनगर येथे बदली.
श्रीमती सुरेखा चव्हाण विशेष भूसंपादन अधिकारी धुळे येथून जिल्हा पुनर्वसन अधिकारी धुळे येथे बदली.
तुकाराम हुलवळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जळगाव या पदावरून उपजिल्हाधिकारी भूसंपादन धुळे या पदावर बदली.
श्री कुमार चिंचकर उपजिल्हाधिकारी भूसंपादन धुळे येथून उपजिल्हा निवडणूक अधिकारी जळगाव येथे बदली.
गडचिरोलीचे उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांना उपजिल्हाधिकारी रोहयो गडचिरोली येथे नेमणूक करण्यात आली.
गोंदियाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती स्मिता पाटील-बेलपत्रे यांचे नियुक्ती निवासी उपजिल्हाधिकारी गोंदिया या पदावर करण्यात आली आहे.
भंडाऱ्याचे उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीपती मोरे यांना नागपूर येथे उपजिल्हाधिकारी भूसंपादन या पदावर नियुक्ती देण्यात आली.
वरोरा चंद्रपूर येथील उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना नागपूर येथे उपजिल्हाधिकारी भूसंपादन या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या श्रीमती रचना इंदुरकर यांना नागपूर येथे वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली.
गडचिरोलीच्या रोहयो उपजिल्हाधिकारी श्रीमती विजया जाधव यांना उपजिल्हाधिकारी रोहयो हिंगोली या पदावर नियुक्ती देण्यात आली.
वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांची नागपूर महानगरपालिकेत उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.
मौदा नागपूर येथील उपविभागीय अधिकारी शाम मदनुरकर यांची मुंबई परिमंडळात उपनियंत्रक शिधावाटप या पदावर नियुक्ती करण्यात आली.
यवतमाळच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती सविता चौधरी-पालवे यांना जालना येथे जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली.
अकोला येथील महसूल उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे यांचे अमरावती येथे सहाय्यक आयुक्त पदावर बदली करण्यात आली.
वाशिमच्या उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार यांना बुलढाणा येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अनुप खांडे आता अमरावतीचे उपजिल्हाधिकारी असतील.
अमरावतीचे नोंदणी उपमा निरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक म्हणून कार्यरत असलेले मोहन जोशी वाशिमला महसूल उपजिल्हाधिकारी म्हणून काम बघतील.
अकोला येथील निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कुलसचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
वाशिम येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शैलेश हिंगे संगमनेरचे नव्हे उपविभागीय अधिकारी असतील.
उस्मानाबादच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी शुभांगी आंधळे आता औरंगाबादच्या सहाय्यक आयुक्त असतील.
जालन्याचे विशेष भूसंपादन अधिकारी गणेश नि-हाळी औरंगाबादचे सहाय्यक आयुक्त असतील.
औरंगाबादच्या मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या श्रीमती अंजली धानोरकर उस्मानाबादला जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून काम बघतील.
जालन्याचे उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांना औरंगाबाद येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी या पदावर नियुक्ती देण्यात आली.
परभणीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा या हिंगोलीच्या विशेष भूसंपादन अधिकारी असतील.
पैठण फुलंब्री येथील उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे हिंगोली येथे (सामान्य) उपजिल्हाधिकारी म्हणून काम बघतील.
औसा-रेनापुरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे जालन्याचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी असतील.
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या देवेंद्र कटके यांना औरंगाबादच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदी नेमण्यात आले.
औरंगाबादचे पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक श्रीमंत हरकर यांना जालन्याचे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आले आहे.
धर्माबाद नांदेड येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे कार्यकारी अधिकारी असतील.
औरंगाबादचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत कदम यांना उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी सारथी लातूर या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
उदगीर चे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी पुण्याच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपजिल्हाधिकारी असतील.
परतुरचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांना त्याच पदावर सेवानिवृत्तीपर्यंत मूदतवाढ देण्यात आले आहे.
औरंगाबादचे विशेष भूसंपादन अधिकारी संदीप पाटील यांना धुळ्याचे विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.
पुणे भूसंपादन चे उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे यांचे मुंबईला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर उपमहाव्यवस्थापक म्हणून बदली करण्यात आली.
सांगलीचे उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांना उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी सारथी औरंगाबाद येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
पुण्याच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती आरती भोसले यांना बार्टी पुणे येथे विभागप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
दौंड-पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांची बीड येथे विशेष भूसंपादन अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली.
भोर पुण्याचे वन जमाबंदी अधिकारी संजय पाटील यांना तेथेच सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ देण्यात आले आहे.
उपजिल्हाधिकारी श्रीमती सुप्रिया करमरकर यांना सक्षम प्राधिकारी उरण-चाकण एलपीजी पाईपलाईन प्रकल्प मुंबई या पदावर नियुक्ती देण्यात आली.
झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी संजय पवार आता मौदा नागपूरचे उपविभागीय अधिकारी असतील.
सांगलीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मारुती बोरकर रत्नागिरीचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी असतील.
कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांचे नियुक्ती मिरजच्या उपविभागीय अधिकारी पदी करण्यात आले आहे.
कोल्हापूर येथील महसूल उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांना सोलापूरचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून नेमण्यात आले.
पुण्याच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती मंजिरी मनोलकर यांना पुणे येथे महसूल उपजिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती देण्यात आली.
मुंबईचे करमणूक करचे उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांना मुंबई उपनगरच्या महसूल प्राधिकरणाचे प्रबंधक म्हणून नेमण्यात आले.
रत्नागिरीच्या भूसंपादन उपजिल्हाधिकारी श्रीमती सविता लष्करे यांची बदली कोल्हापूर येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी पदावर करण्यात आली.
संजय गांधी योजनेचे मुंबईचे उपजिल्हाधिकारी सर्जेराव सोनावणे यांना रायगड येथे जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली.
पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर आता मालाडचे उपजिल्हाधिकारी असतील.
कुलाबाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती कारले बांद्राच्या उपजिल्हाधिकारी असतील.
चिपळूणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार रायगडचे उपजिल्हाधिकारी असतील.
रत्नागिरीचे विकास सूर्यवंशी यांना रायगड येथे उपजिल्हाधिकारी रोहयो या पदावर नियुक्ती देण्यात आली.
मुंबई महसूल प्राधिकरणाचे प्रबंधक एकनाथ नवले मुंबईच्या करमणूक कर शाखेचे उपजिल्हाधिकारी असतील.
पनवेलच्या भूसंपादन उपजिल्हाधिकारी श्रीमती दीपा भोसले माणगाव येथील काळ प्रकल्पाच्या उपजिल्हाधिकारी असतील.
माणगावचे काळ प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी नितीन राऊत पनवेलच्या भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी असतील.
दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांची नियुक्ती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सिंधुदुर्ग येथे करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड यांना धारावी येथे उपजिल्हाधिकारी नेमण्यात आले.
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या श्रीमती सुचिता बिकानेर यांना कोकण भवनच्या उपजिल्हाधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.
कोकण विभागाच्या भूसंपादन उपजिल्हाधिकारी श्रीमती निशाताई कांबळे यांना रत्नागिरी येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली.
सामान्य प्रशासन च्या अप्पर सचिव श्रीमती आरती देसाई यांना सिंधुदुर्गच्या उपजिल्हाधिकारी भूसंपादन पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
उपजिल्हाधिकारी राजू नंदकर यांना पुणे महापालिकेत उपायुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली.
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विनोद खेडकर यांना ठाण्यात कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली.
मुलुंडच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती कल्पना भोसले-जगताप यांना एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आले आहे.
बृहन्मुंबई मनपाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती सुकेशिनी कांबळे-पगारे यांची नांदेडला विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.
नवी मुंबई सिडको चे उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे रत्नागिरीचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी असतील.
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या श्रीमती संगीता टकले यांना लातूर येथे पूर्ण प्रकल्पाच्या विशेष भूसंपादन अधिकारी पदावर नेमण्यात आले.
सिंधुदुर्गच्या भूसंपादन उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण सांगलीच्या भूसंपादन उपजिल्हाधिकारी असतील.
उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आरे प्रकल्प मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,880
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.