Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निष्क्रिय पोलिसांमुळे संगमनेर चोरांच्या हाती; निवृत्त शिक्षिकेचे साडेतीन लाखाचे दागिने चोरट्यांनी बस स्थानकातून लांबविले
गुन्हेगारी

निष्क्रिय पोलिसांमुळे संगमनेर चोरांच्या हाती; निवृत्त शिक्षिकेचे साडेतीन लाखाचे दागिने चोरट्यांनी बस स्थानकातून लांबविले

बस स्थानकावरील महिलांच्या दागिन्याच्या चोऱ्या रोखण्यास संगमनेरचे कार्यक्षम पोलीस अपयशी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

संगमनेर बस स्थानकामधून दररोज दागिने चोरीच्या घटना समोर येत आहे. बस स्थानकावरील पोलीस चौकी केवळ देखावा बनली असून या चोऱ्या रोखण्यास संगमनेर पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. संगमनेरहून राहुरीच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये चोरट्यांनी हात मारत एका निवृत्त शिक्षिकेचे तब्बल साडेदहा तोळे वजनाचे दागिने हातोहात लंपास केले.

दागिने, दुचाकी चोरांसोबतच घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी संगमनेरात उच्छाद मांडला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे संगमनेरातील अवैध धंदे मात्र कोणत्याही कारवायाविना सुरूच आहे. अकार्यक्षम पोलिसांच्या निष्क्रियतेचा फटका संगमनेर करांना बसत असून तक्रारदारालाच पोलिसांकडून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाऊ लागले आहे. त्यामुळे चोरी परवडली, पण पोलीस चौकशीचा ससेमिरा नको, असे म्हणण्याची वेळ तक्रारदारांवर आली आहे. चोरट्यांचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या तपासाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. पोलीस ठाण्यात जुन्या जाणत्या माहितगार अधिकाऱ्यांची वाणवा निर्माण झाल्याने चोरटे पोलिसांना तुरी देऊ लागले आहेत.

सोमवारी घडलेल्या या चोरीच्या घटनेसंदर्भात बुधवारी रात्री पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. निवृत्त शिक्षिका रजनी सूर्यभान सहाणे (वय 63 वर्ष रा. घुलेवाडी संगमनेर) या सोमवारी दुपारी मुलीसह संगमनेर बस स्थानकातून राहुरीकडे जात होत्या. बस स्थानकावर बसमध्ये जागा मिळविण्यासाठी मोठी गर्दी होती. महत प्रयासानंतर त्यांना बस मध्ये जागा मिळाली. बस स्थानकातून बस काही अंतर गेल्यावर तिकीट काढण्यासाठी त्यांनी आपल्या जवळील पर्स उघडले असता पर्समधील सोन्याचे दागिने असलेला डबा लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे त्यांनी बसच्या कंडक्टरला हा प्रकार सांगितला. त्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांच्या बॅग, पिशव्या तपासल्यानंतर देखील दागिने आढळले नाही. पुढील प्रवासासाठी जाणे गरजेचे असल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली नाही. मात्र बुधवारी परतल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून चोरी संदर्भात माहिती दिली. या घटनेमध्ये सहाणे यांच्या पर्स मधून तब्बल सव्वा तीन लाखाचे दागिने लंपास झाल्याचे म्हटले आहे. चोरट्याने 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे चार तोळ्यांचे गंठण, 90 हजाराचा राणीहार, 60 हजार रुपयांची दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी, 45 हजार रुपयांच्या दीड तोळे वजनाच्या दोन अंगठ्या आणि चारशे रुपये किमतीच्या दोन चांदीच्या अंगठ्या असा एकूण 3 लाख 15 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 395
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.