Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणारे दोघे वनविभागाने पकडले; एक पळून जाण्यात यशस्वी
गुन्हेगारी

बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणारे दोघे वनविभागाने पकडले; एक पळून जाण्यात यशस्वी

संगमनेर वनविभागाची यशस्वी कामगिरी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

संगमनेरात आता बिबट्यांच्या अवयवाच्या तस्करीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघा तस्करांना पकडण्यात संगमनेरच्या वनविभागाला यश आले आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. संगमनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन एच. लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

शनिवारी (ता. १९ मे) नासिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ दुचाकीवरून येणारे काही लोक बिबट्याच्या दात सुळे नखे आणि मिशांची विक्री करणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजली होती. या माहितीच्या आधारे वनक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी या परिसरात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. संशयित व्यक्ती या ठिकाणी आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून संशयतांसोबत बोलणी केली. त्यांच्याकडे बिबट्याचे अवयव असल्याचे खात्री होताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले.

कारवाई दरम्यान दोघेजण वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागले. श्रीराम यादव सरोदे वय ३४ वर्षे व सुधीर विजय भालेराव वय ३० वर्ष ( दोघे रा. आनंदवाडी, चंदनापुरी ता. संगमनेर) अशी पकडलेल्या दोघांची नावे असून सुशांत उत्तम भालेराव (रा. आनंदवाडी, चंदनापुरी ता. संगमनेर) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पकडलेल्या दोघा आरोपींकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याची नखे, दात आणि इतर अवयव जप्त केले आहेत.

मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असलेल्या संगमनेर अकोले तालुक्यात वनविभागाची कार्यशैली नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. मात्र वनविभागाच्या या कारवाईमुळे संगमनेरात वनखाते अस्तित्वात असल्याची चुणूक या कारवाईतून मिळाली आहे.

उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील, जुन्नरचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते, योगेश वरखड यांच्या मार्गदर्शनाखाली रईस मोमीन, संदीप येवले, कुणाल घुले, तन्मय बागल, हरून सय्यद, विक्रांत बुरांडे, अरुण देशमुख, गजानन पवार, वनपाल चैतन्य कासार, एस. एम. पारधी, जी. बी. पवार यांनी ही कारवाई केली. फरार झालेल्या तिसऱ्या आरोपीचा वनविभागाकडून शोध सुरू आहे.

आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. योगेश वरखड मुंबई, उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील, जुन्नरचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 790
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.