Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पक्षी पकडण्यासाठी मध्यरात्री तो थेट मोबाईल टॉवरवर चढला आणि जीव गमावून बसला
अपघात

पक्षी पकडण्यासाठी मध्यरात्री तो थेट मोबाईल टॉवरवर चढला आणि जीव गमावून बसला

संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/05/2023Updated:22/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

रात्रीच्या वेळी मोबाईल टॉवरवर आराम करण्यासाठी बसलेल्या विविध प्रकारच्या पक्षांना पकडण्यासाठी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो मोबाईल टॉवरवर चढला. मध्यरात्रीच्यावेळी टॉवरवर चढलेल्या या युवकाला टॉवरच्या उंचीचा अंदाज आला नाही. पक्षी पकडण्याच्या नादात टॉवरवरून तोल जाऊन खाली पडताना तो जीव गमावून बसला.

संगमनेर तालुक्यातील अंभोरे या गावी रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. गणेश भास्कर गवळी (वय अंदाजे 27 वर्ष) असे या मृत झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. गवळी हा लहानपणापासून आणि लग्नानंतरदेखील पत्नी आणि दोन मुलींसह आपला मेव्हणा काळू बर्डे यांच्याकडे राहावयास होता. रविवारी गावात कार्यक्रम असल्याने गणेश गवळी याने मद्य प्राशन केल्याची माहिती समजते.

रात्री गावातील मोबाईल टॉवरवर अनेक पक्षी बसलेले बघून त्यांना पकडण्याचा मोह गवळी याला झाला. त्यामुळे रात्री तो पक्षांना पकडता येईल या उद्देशाने मोबाईल टॉवरवर चढला होता. पक्षी पकडण्याच्या नादात गवळी तोल जाऊन खाली पडला. खाली पडत असताना टॉवरच्या मध्यभागी एका लोखंडी अँगलला तो लटकला गेला.

सकाळी टॉवरवर गवळी लोखंडी अँगलला लटकलेला असल्याचे शेजारील काही लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी याची माहिती गावचे पोलीस पाटील विनोद साळवे यांना दिली. साळवे यांनी घटनास्थळी जात मोबाईल टॉवरवर गवळी मृत अवस्थेत लटकलेला असल्याची खातरजमा केल्यानंतर याची माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याला कळविली.

गवळी याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी संगमनेर तालुका पोलिसांची संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 933
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.