Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात विधवेवर अत्याचार; तीस लाखाची फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरात विधवेवर अत्याचार; तीस लाखाची फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फेसबुकच्या माध्यमातून झाली होती ओळख
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार करून वेळोवेळी तिच्याकडून सुमारे 30 लाख रुपये घेऊन ते परत देण्यास नकार देत विधवेच्या मुलीस मारून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी समोर आला.

सप्टेंबर 2020 चे 1 मे 2023 या काळात संगमनेर आणि शिर्डीमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या संदर्भात संबंधित महिलेने शहर पोलीस ठाण्यात बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरून आळंदी (जि. पुणे) येथील योगेश सुभाष टोपेकर यांच्या विरोधात अत्याचार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश टोपेकर याची कोविड काळामध्ये फेसबुकवर पीडित महिलेची ओळख झाली होती. फेसबुकवर झालेल्या संभाषणातून ती विधवा असल्याची माहिती टोपेकर याला मिळाल्यानंतर त्याने या महिलेशी वेळोवेळी फोनवरून संपर्क साधत तिच्याशी जवळीक वाढविली. ओळखीतूनच त्याचे या महिलेच्या घरी येणे जाणे सुरू झाले. मी तुझ्याबरोबर लग्न करतो, असे आमिष दाखवत त्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर संगमनेर येथील तिच्या राहत्या घरी आणि शिर्डीतील हॉटेलमध्ये वारंवार अत्याचार केले.

तसेच या दरम्यानच्या काळात त्याने तिच्याकडून 30 लाख 37 हजार 079 रुपये फोन पे, गुगल पेद्वारे ऑनलाईन घेतले. पीडित महिलेने विश्वासापोटी त्याला वेळोवेळी पैसे दिले. महिलेने दिलेल्या पैशाची त्याच्याकडे मागणी सुरू केली असता त्याने मी तुझ्यासोबत लग्न करतो. पैशाबद्दल बोलू नकोस, नाहीतर तुझ्या मुलीस मारून टाकेल, असा दम देखील पीडित महिलेला दिला.

पैसे परत मिळावे यासाठी पीडित महिलेने वारंवार योगेश टोपेकर याच्याशी संपर्क साधला असता आरोपी टोपेकर याने त्याचा मोबाईल फोन बंद करून टाकला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने बुधवारी संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठून आरोपीने आपली आर्थिक फसवणूक केल्याचे तसेच आपल्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी एकटेपणाचा फायदा घेऊन अत्याचार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,219
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.