Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिलेचा विनयभंग, लज्जास्पद वर्तन करत तिला चावा घेतल्याप्रकरणी दिर आणि जावेविरोधात गुन्हा दाखल; साकुर येथील घटना
गुन्हेगारी

महिलेचा विनयभंग, लज्जास्पद वर्तन करत तिला चावा घेतल्याप्रकरणी दिर आणि जावेविरोधात गुन्हा दाखल; साकुर येथील घटना

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

घारगाव – गावाकडे साकुर येथे घरी आलेल्या दोन जावांमधील वादाची परिमिती नवरा-बायकोने महिलेला मारहाण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करत तिचा विनयभंग करण्यापर्यंत पोहोचली. वादामध्ये महिलेच्या बोटालाही चावा घेऊन तिच्या अंगावरील कपडे फाडण्यात आले. संगमनेरच्या पठार भागात साकुर येथे गुरुवारी हा प्रकार घडला.

पीडित महिला आपल्या पतीसह गावी साकुर येथे राहावयास असून पतीच्या नोकरी निमित्ताने चिंचवड पुणे येथे रहावयास आहे. अधून मधून कुटुंबीयासह पीडित महिलेचे आपल्या पतीच्या गावी साकुर येथे येणे-जाणे असते. साकुर येथील घरी महिलेचा दीर आपल्या कुटुंबीयासह रहावयास आहे. गावाकडे आल्यानंतर हे सर्वजण एकत्र राहत असत.

गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेचे पती बाहेरून येताना श्रीखंड घेऊन आले होते. पीडित महिलेचा मुलगा आणि पुतणी श्रीखंड खात असताना तेथे आलेल्या जावेने तिच्या मुलीस उद्देशून, आपण भिकारी आहोत का? तू त्यांचे श्रीखंड का खाते? त्यांना तिकडे खायला मिळत नाही, म्हणून ते इकडे येतात. असे म्हणून पीडित महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पीडित महिलेने आपल्या जावेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

दोघींमध्ये वाद सुरू असताना पीडित महिलेच्या दिरानेही आपल्या भाऊजयीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. महिलेने दोघा नवरा बायकोला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दिराने आपल्या भावजयीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिला पाय धरून ओढत बाथरूमकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने प्रतिकार केला असता, दिराने आपल्या भाऊजईच्या बोटाला चावा घेत मारहाण केली. तसेच तिला झटू लागला या झटापटीत तिचे कपडे फाडत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. तसेच भांडण सोडविण्यासाठी मधे पडलेल्या आपल्या भावालाही म्हणजेच पीडित महिलेच्या पतीलाही मारहाण करून शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली.

महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात तिच्या दिर आणि जावेविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 325, 354, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक डी. एम. चौधरी पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 726
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.