Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » …आज ईनको जिंदा घर नही जाने देंगे म्हणत जोर्वे नाक्यावर गुंडागर्दी! सुमारे दीडशे लोकांकडून जोर्वेच्या नागरिकांना जीवे मारण्याचा प्रयत्न, आठजण जखमी
गुन्हेगारी

…आज ईनको जिंदा घर नही जाने देंगे म्हणत जोर्वे नाक्यावर गुंडागर्दी! सुमारे दीडशे लोकांकडून जोर्वेच्या नागरिकांना जीवे मारण्याचा प्रयत्न, आठजण जखमी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/05/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आरोपींनी केला लाकडी दांडके, फायटर, चॉपर, रॉड, तलवारीचा वापर; सतर्क पोलिसांमुळे परिस्थिती नियंत्रणात… गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – पिकअप मधून जाताना शहरातील जोर्वे नाका येथे हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून पिकअपमधील लोकांना टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून उपचारानंतर घरी परतत असणाऱ्या या लोकांवर पुन्हा शंभर ते दीडशे लोकांनी “ये वही लोग है जो अपने खिलाफ पोलीस स्टेशन को तक्रार देने गये थे, आज इन्हे जिंदा घर नही जाने देंगे” असे म्हणत तलवार, चॉपर, फायटर, लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने हल्ला करीत त्यांना जिवे मारण्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. या हल्ल्यात आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान या प्रकारामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान रात्री उशिराने पोलीस बंदोबस्तात या परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली आहे.

सुनील पोपट थोरात, तन्मय राजेश दिघे, पुंडलिक पोपट दिघे, विजय मंजाबापू थोरात, अजय भिमाजी थोरात, जितेंद्र कैलास दिघे, रवींद्र नामदेव गाडेकर व बाबासाहेब शिवाजी थोरात (सर्व रा. जोर्वे, ता. संगमनेर) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात व एका जखमेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

जखमी रवींद्र नामदेव गाडेकर यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ज्ञात सतरा आरोपींसह अज्ञात शंभर ते दीडशे आरोपीं विरोधात भारतीय दंड विधान कलम 307, 324, 143, 147, 148, 149 व आर्म अॅक्ट 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची पोलिसांनी तात्काळ दाखल घेतल्याने शहराच्या काही भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव पुढील तपास करत आहे.

आरोपींमध्ये बाबू टपरीवाला (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), इमरान वडेवाला (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), नदीम हुसेन शेख, इम्रान (युसुफ पेंटरचा मुलगा, पूर्ण नाव पत्ता माहित नाही) साफीक चहावाला (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), साफिक (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), इरफान (पूर्ण नाव माहित नाही) ताहीर नजीर पठाण (पूर्ण पत्ता माहीत नाही), शाहिद वाळूवाला (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), मुसेफ शेख (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), इफू वडेवाला (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), अराफत रफिक शेख (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), इरफान वडेवाला याच्याकडे काम करणारे तिघेजण (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्यासह अन्य शंभर ते दीडशे जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे.

अधिक माहिती अशी, जखमी एका पिकअप मधून आपल्या जोर्वे गावाकडे जात असताना जोर्वे नाका येथे हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन ते घरी दुचाकीवरून पुन्हा परतत असताना नाक्यावर जमलेल्या शंभर ते दीडशे लोकांनी त्यांना अडवत धारदार शास्त्रांचा वापर करत मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला या मारहाणीमध्ये आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी जात परिस्थिती नियंत्रणात आणली. मारहानीनंतर रात्री उशिरा पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात जोर्वे येथील नागरिक आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी जमा झाले होते. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून मोठ्या प्रमाणात पोलीस दलाला पाचारण करण्यात आले आहे.

संगमनेर शहराची कायदा, सुव्यवस्था, शांतता बिघडविण्याचा कोणी प्रयत्न करत असेल आणि तो कोणीही आणि कितीही मोठा असला तरी अशा गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही. आरोपींवर पोलीस कडक कारवाई करतील.

भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,139
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.