Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » समनापुर दगडफेक प्रकरणी सतरा जणांना अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
गुन्हेगारी

समनापुर दगडफेक प्रकरणी सतरा जणांना अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/06/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – शहरानजीकच्या समनापुर येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी 17 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दगडफेक प्रकरणामुळे संगमनेर तालुक्याच्या शांततेला गालबोट लागले असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हिंदू समाजावरील अन्याय अत्याचारा विरोधात मंगळवारी सकल हिंदू समाजाने भगवा मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद लाभला. याशिवाय संगमनेरकरांनी उत्स्फूर्तपणे शंभर टक्के बंद पाळला होता. प्रांताधिकारी कार्यालय समोर झालेल्या भगवा मोर्चाच्या समारोपानंतर नागरिक आपापल्या गावाकडे परतत असताना संगमनेर नजीकच्या समनापुर येथे दगडफेकीची घटना घडली. यात चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसानदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात आले. याशिवाय दोन कुटुंबीयांवर दगडफेक व मारहाण करण्याचा प्रकार घडला होता.

यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळतच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक देविदास ढ़ुमणे आदींसह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकारामुळे अतिशय नियोजनबद्ध, शांततेत व यशस्वीपणे पार पडलेल्या संगमनेरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भगवा मोर्चाला गालबोट देखील लागले.

या संदर्भात संगमनेरमधील खाजगी रुग्णालयात अति दक्षता विभागात उपचार घेणाऱ्या समनापुर येथील रहिवासी व जखमी असलेल्या इस्माईल फकीर मोहम्मद शेख (वय 60 वर्ष) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी हे शेतात घासाला पाणी भरत असताना 20 ते 25 भगवे झेंडे घेतलेल्या, भगव्या टोप्या घातलेल्या तरुण मुलांनी मोटार सायकलवरून त्यांच्या घरासमोर येत घरावर दगडफेक केली व घोषणा दिल्या. तसेच दगडफेक करणाऱ्यांनी घरात घुसून नुकसान केले. फिर्यादीच्या तोंडावर लोखंडी रॉड मारल्याने त्यांचे चार दात तुटले. आरोपींनी यांच्या घराजवळ राहणारे फकीर मोहम्मद शेख यांच्या घरावरील करून घरासमोरील मोटार सायकलचे नुकसान केले. तसेच अन्य दोन घरांवर दगडफेक केल्याच्या तक्रारीत म्हटले आहे. दगडफेक करणारे तरुण गावातील नसून ते इतरत्र ठिकाणचे होते, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. काल मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी यातील सतरा आरोपींना अटक केली होती.

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये उज्वल सोपान घोलप, शुभम बाळासाहेब कडू, तनुज शरद कडू, ऋषिकेश शरद घोलप, महेश विजय कडू (सर्व रा. पाथरे, ता. राहाता), दत्तात्रय संपत थोरात, आबासाहेब शिवराम थोरात, सुनील बाबासाहेब थोरात, ललित अनिल थोरात, प्रमोद संजय थोरात, सत्यम भाऊसाहेब थोरात (सर्व रा. वडगाव पान, ता. संगमनेर), भाऊसाहेब यादव जोंधळे, विकास अण्णासाहेब जोंधळे, अविराज आनंद जोंधळे (सर्व रा. कोकणगाव, ता. संगमनेर) कुणाल ईश्वर काळे, करण ज्ञानेश्वर काळे (दोघे रा. माळेगाव हवेली, ता. संगमनेर) व वैभव रंगनाथ बिडवे (रा. मनोली, ता. संगमनेर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अटक केलेल्या सर्व आरोपी विरोधात भा.द.वि. 143, 147, 148, 149, 323, 324, 325, 326, 452, 427 व क्रिमिनल लॉ अमायमेंट कायदा कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,964
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.