Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एकीकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि दुसरीकडे हातामध्ये धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्याला नगरच्या पथकाने पकडले
गुन्हेगारी

एकीकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि दुसरीकडे हातामध्ये धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्याला नगरच्या पथकाने पकडले

शांतता प्रिय संगमनेरात नेमकं चाललंय तरी काय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/06/2023Updated:07/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – भगवा मोर्चाच्या दिवशी संपूर्ण जिल्हा पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर असताना संगमनेर शहरातील पुणे नाक्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुपारी हातामध्ये धारदार तलवार घेऊन भर चौकात फिरणाऱ्या एकाला पकडले.

लक्षवेधी ठरलेला भगवा मोर्चा शांततेत आणि नियोजित वेळेत पार पडल्यानंतर बराच गदारोळ झाला. पोलीस ठाण्यात दगडफेक, हाणामारीचे गुन्हे दाखल झाले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने या पार्श्वभूमीवर शहरात वातावरण तणावाचे होते. वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या. अशाही परिस्थितीत पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते. अपवादात्मक घटना तातडीने नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

मोर्चानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पोलिसांची धावपळ सुरूच असताना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथक संगमनेर शहरात गस्त घालत होते. या पथकाला वेगळीच चाहूल लागली आणि हातात धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक गुन्ह्याची माहिती दडविणाऱ्या पोलीस ठाण्यातून हा प्रकार समोर आला आहे.

मोर्चा झाल्यानंतर घडलेल्या काही घटनांमुळे काही बाबी हळूहळू उघडकीस येऊ लागल्या आहेत. मोर्चा संदर्भात कुठलीही माहिती द्यायची नाही असा कायदा पोलिसांनी स्वतःच्या मर्जीने करून टाकला. विशेष म्हणजे दाखल झालेले गुन्हे आणि अटक केलेल्या आरोपींची देखील माहिती द्यायची नाही असा पोलिसांचा पवित्रा आहे. हा प्रकार म्हणजे आरोपींना पाठीशी घालण्यासारखेच असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांचा गुन्हा आणि आरोपींची नावे लपवण्यामागे कुठला हेतू आहे ? नोंदणी झालेले गुन्हे आणि गुन्ह्याची माहिती माध्यमांना देणे आवश्यक आहे. यातून समाजात पोलिसांच्या कामाबद्दल चांगला संदेश जाऊ शकतो आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्याची मदत होऊ शकते याचा विसर पडलेले स्थानिक पोलीस मात्र गुन्ह्यांची माहिती देण्यासंदर्भात लपवाछपवी करत आहेत. तरी देखील माहितीला पाय फुटतात आणि त्याची बातमी बनते.

असाच हा तलवारीचा प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यातील दाखल झालेल्या या घटनेचा एफआयआर ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या हाती लागला.

भगवा मोर्चाच्या दिवशी मंगळवारी (ता. ६ जून) नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल विजय सिद्धार्थ धनेधर यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात या संदर्भातील गुन्हा नोंदविला गेला. भगवा मोर्चाच्या दिवशी दुपारी संगमनेर शहरातील जोर्वे नाक्याच्या पुढे जुना पुना नाका परिसरात एक इसम हातामध्ये धारदार तलवार घेऊन आजूबाजूला फिरत असल्याचे नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला समजले. त्यानुसार त्यांनी सदर ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता शहरातील नाईकवाडपुरा येथील रहिवासी रौफ इस्माईल शेख नावाचा इसम हातामध्ये तलवार घेऊन फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संबंधित इसमाकडून दोन फूट लांब आणि मोठी पितळी मूठ असलेली टोकदार, धारदार तलवार जप्त केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,583
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.