Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भविष्यकालीन मिरवणुक मार्गासाठी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा मोठा निर्णय! मागितल्या …
प्रशासन

भविष्यकालीन मिरवणुक मार्गासाठी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा मोठा निर्णय! मागितल्या …

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – अहमदनगर शहरात भविष्यकालीन मिरवणुकांसाठी प्रशासकीय सोईच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- इंपिरियल चौक- माळीवाडा वेस- आयुर्वेद कॉर्नर- अमरधाम समोरून- नेप्तीनाका- दिल्लीगेट या मार्गाच्या प्रस्तावास मान्यता देणे प्रस्तावित आहे. या मार्गाच्या निश्चितीसाठी कोणाची सूचना अथवा हरकत असल्यास 30 जुन, 2023 पर्यंत लेखी स्वरूपात गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे समक्ष सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

अहमदनगर शहराच्या हद्दीत डीजे, डॉल्बी सिस्टिम लावून शोभा मिरवणुका छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- माळीवाडा वेस- पंचपीर चावडी- तख्ती दरवाजा- कापड बाजार- टेलिखुद-चितळेरोड- चौपाटी कारंजा या मार्गाने काढण्यात येतात. या मिरवणूक मार्गातील रस्ते लहान आहेत. मिरवणुकीत विविध मंडळाच्यावतीने ठेवण्यात आलेल्या पुतळ्यांची उंची ही 15 फुटापेक्षा जास्त असल्याने मिरवणूक मार्गावरील विद्युततारा व दूरध्वनीच्या तारामुळे मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते.

मिरवणूक मार्गावर हिंदू मुस्लिम संमिश्र लोकवस्ती असलेली ठिकाणे असल्याने त्या ठिकाणी किरकोळ कारणावरून वाद होऊन मोठया प्रमाणावर जातीय तेढ निर्माण झालेला असून एकमेकाविषयी द्वेषभावना वाढीस लागलयाचे निदर्शनास येत आहे.

सर्व प्रकारच्या मिरवणूका या कापड बाजारातून जात असल्याने बॅरिकेटिंगमुळे व्यावसायिकांचे व्यवहार बंद होतात. त्यामुळे बाजार पेठेतील ग्राहकांचे व व्यापाऱ्यांच्या मनामध्ये नाराजी निर्माण झालेली असून ते रोष व्यक्त करत आहेत.

मागील काही मिरवणुकामध्ये दगडफेक, खुनी हल्ले, अश्या प्रकारचे अनुचित प्रकारदेखील घडलेले आहेत. यामुळे संबंधित पोलीस यंत्रणेमार्फत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33 (ओ) अन्वये भविष्यातील मिरवणूका व दीर्घकालीन भविष्यकालीन परिस्थिती डोळयासमोर ठेऊन पर्यायी मिरवणूक मार्गाची पहाणी केली असता यापुढील कालावधीमध्ये काढण्यात येणारे श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक, कत्तलची रात्र व मोहरम विसर्जन मिरवणूक या पारंपारिक उत्सव मिरवणूक वगळता अहमदनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहणेच्या दृष्टीकोनातून कापड बाजारातून सर्व प्रकारच्या मिरवणूका न नेता प्रशासकीय सोईनुसार भविष्यकालीन मिरवणुकांसाठीच्या प्रस्तावास मान्यता देणे प्रस्तावित आहे.

संबंधितांनी त्यांच्या लेखी स्वरुपातील सूचना अथवा हरकती वेळेत दाखल कराव्यात. विहित दिनांकानंतर सूचना अथवा हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 944
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.