Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुचाकीवरून आलेल्या दोघांनी औषध विक्रेत्याच्या पत्नीच्या गळ्यातील ४० हजाराचे मंगळसूत्र लांबविले; संगमनेरात दागिने चोरीचे मालिका सुरूच
गुन्हेगारी

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी औषध विक्रेत्याच्या पत्नीच्या गळ्यातील ४० हजाराचे मंगळसूत्र लांबविले; संगमनेरात दागिने चोरीचे मालिका सुरूच

दागिने चोरीच्या घटना सुरूच
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – गुन्हेगारीचे माहेरघर झालेल्या संगमनेरमध्ये दागिने चोरीचा सिलसिला सुरूच आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रात्री जेवणानंतर फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढत धूम स्टाईलने पोबारा केला. या प्रकारामुळे दागिने चोरीच्या घटनेत आणखी एका गुन्ह्याची वाढ झाली.

बस स्थानकापासून जवळच असलेल्या पावबाकी रस्त्यावर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या संदर्भात जानकीनगरमध्ये दूधगंगा पतसंस्थेजवळ राहणाऱ्या सविता शशिकांत मुळे वय 65 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औषध विक्रेते असलेले शशिकांत मुळे हे रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जेवणानंतर पत्नी सविता यांच्यासोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. पावबाकी रस्त्याने फिरत असताना काही अंतर गेल्यावर जाणता राजा मैदानाकडून पावबाकी रस्त्याला मिळणाऱ्या रस्त्यावरून एका दुचाकीवर दोघेजण भरधाव वेगात त्यांच्याजवळ आले. काही समजण्यापूर्वीच दुचाकी चालकाने दोघांच्यामध्ये दुचाकी घातली. याच दरम्यान दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने सविता मुळे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढत भरधाव वेगाने नाटकी रस्त्याच्या दिशेने निघून गेले.

गळ्यातील पोत ओढल्याचे लक्षात येताच या दांपत्याने आरडाओरडा केला. त्यामुळे तेथे गर्दी जमली मात्र घटनास्थळी पुरेसा प्रकाश नसल्याने दुचाकीवरील नंबर दिसून आला नाही. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात येत याची माहिती दिली. सविता मुळे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सोन्याचे मनी मंगळसूत्र असलेले दोन तोळे वजनाचे सुमारे ४० हजार रुपये किमतीची पोत अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याबाबत भारतीय दंड संहिता कलम 392 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पवार करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 882
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.