Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तिघा लाचखोरांनी चेकनेच घेतली 75 हजाराची लाच; शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक, लिपिकांची लाचखोरी
गुन्हेगारी

तिघा लाचखोरांनी चेकनेच घेतली 75 हजाराची लाच; शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक, लिपिकांची लाचखोरी

लाचखोरांचे लाचखोरीचे नवे पर्याय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

नाशिकच्या दोन शिक्षणाधिकाऱ्यांचे लाचेचे प्रकरण ताजे असतानाच राज्याचा शिक्षण विभाग दिवसेंदिवस लाचखोरीने ग्रासल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहे. आता तर चक्क चेकनेच 75 हजार रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार एसीबीच्या कारवाईत समोर आला आहे. तिघा लाचखोरांवर एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लाचखोरीचे विविध प्रकार समोर येत असतानाच आता चेकद्वारे लाच खाणारे तिघेजण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. यात शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक आणि लिपिकाचा समावेश आहे.

यासंदर्भात अँटी करप्शन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार विनोद शंकर जाधव (वय 42 वर्ष, मुख्याध्यापक, महात्मा फुले हायस्कूल, एरंडोल) नरेंद्र उत्तम वाघ (वय 44 वर्ष, कनिष्ठ लिपिक, महात्मा फुले हायस्कूल, एरंडोल) व विजय पंढरीनाथ महाजन (वय 56 वर्ष, अध्यक्ष श्री. सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव संचलित महात्मा फुले हायस्कूल, एरंडोल) अशी तिघा लाचखोरांची नावे आहेत.

नासिक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सापळा पर्यवेक्षण अधिकारी जळगावचे पोलीस उपाधीक्षक शशिकांत पाटील, सापळा व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील, रवींद्र घुगे, पोलीस नाईक ईश्वर धनगर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन चाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

याशिवाय कारवाई मदत पथकामध्ये पोलीस निरीक्षक एस. के. बच्छाव, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शैला धनगर, पोलीस नाईक किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांचा समावेश होता.

अधिक माहिती अशी, महात्मा फुले हायस्कूल, एरंडोल येथे उपशिक्षक पदावर कार्यरत असलेल्या दोघांची बदली 1 एप्रिल 2023 रोजी एरंडोल हायस्कूल येथून महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे करण्यात आली होती. या बदलीच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव 2 मे 2023 रोजी शिक्षण अधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पाठविण्यात आला.

या बदलीस स्थगिती मिळावी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा. अशा आशयाचे संस्थेचे पत्र शिक्षण अधिकारी, जळगाव यांना देणे आवश्यक होते. या कामासाठी लाचखोर मुख्याध्यापक आणि लिपिकाने दोन्ही उपशिक्षकांकडे लाचेची मागणी केली. या दोघांनी स्वतःसाठी आणि संस्थेच्या लाचखोर अध्यक्षासाठी पूर्ण एक महिन्याचा पगार म्हणजेच 75 हजार रुपये चेकच्या रूपाने देण्यास या दोघा शिक्षकांना सांगितले होते.

त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली एसीबीने तक्रारीची पडताळणी करत सापळा रचला. अध्यक्षाने लिपिकाच्या फोनवरून फोन करत मुख्याध्यापकाच्या नावाने पूर्तता करण्यास सांगितले होते. 75 हजार रुपयांचा मुख्याध्यापकाच्या नावाने असलेला चेक लाचखोर मुख्याध्यापक जाधव याने स्वीकारला. चेक स्वीकारताच त्याला पथकाने रंगेहाथ पकडले असून मुख्याध्यापक, लिपिक आणि संस्थेच्या अध्यक्षावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,592
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.