Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला पळवून नेत सहा महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करणारा नराधम पकडला!
गुन्हेगारी

लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला पळवून नेत सहा महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करणारा नराधम पकडला!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/06/2023Updated:17/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पीडित मुलगी गर्भवती; अकोले तालुक्यातील घटना

जर आईच्या घरी गेली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी

महाराष्ट्र संवाद न्यूज

अकोले – सहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या व तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा शोध लावण्यास यश आले आहे. मात्र या दरम्यान पीडित मुलीवर वेळोवेळी केलेल्या अत्याचारामुळे ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आकाश राजू उघडे (वय ३० वर्ष, हल्ली रा. विरगाव, ता. अकोले, मूळ रा. शेळके वस्ती, नांदुरी दूमाला ता. संगमनेर) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या पालकांनी सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलीचा नातेवाईकांच्या मदतीने शोध घेतला असता ती गिरगाव शिवारातील बाळू नाईकवाडी यांच्या शेतातील घरामध्ये आढळून आली.

फिर्यादीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादीच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी आकाश उघडे हा फिर्यादीच्या घरी येत-जात असे. फिर्यादीच्या मुलीस तू मला आवडतेस आपण लग्न करू असे म्हणून आपण कुठेतरी जाऊ असे सांगत सहा महिन्यापूर्वी आरोपीने फिर्यादीच्या मुलीला पळवून नेले होते.

सहा महिन्याच्या या कालावधीत आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. व त्यापासून तिला दिवस गेले. ती गर्भवती आहे. तसेच आरोपीने तिला ‘तू जर तुझ्या आईकडे घरी जायचे नाही तू जर आईच्या घरी गेलीस तर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकीसुद्धा दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मुलगी अल्पवयीन असताना देखील तिला लग्नाचे आमीष दाखवून घरातून पळवून नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला म्हणून पोलिसांनी सदर आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्यास ताब्यात घेतले आहे.

यासंदर्भात अकोले पोलीस ठाण्यात आरोपी राजू उघडे यांच्याविरुद्ध गुन्हा नंबर 392 / 2023 भारतीय दंड विधान कलम 376 (2)(1)(N) 376(3) 366(अ) 506 सह पोक्सो 4,5 (1) (2) उल्लंघन 6,10 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हंडोरे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,518
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर चाप लावण्यासाठी पोलीस…

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.