Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’; इतक्या केल्या कारवाया
गुन्हेगारी

सहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’; इतक्या केल्या कारवाया

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या संगमनेर-अकोले तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून बुधवारी पहाटे दोन वाजेपर्यंत ‘कोंबिंग ऑल आऊट ऑपरेशन’ राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या.

आगामी काळात येऊ घातलेले सण, उत्सव शांततेमध्ये पार पडावेत, त्याचप्रमाणे गुन्हेगारांवर एकत्रित रित्या एकाच वेळी कारवाई करण्याच्या उद्देशाने संगमनेर शहर संगमनेर तालुका घारगाव आश्वी अकोले आणि राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन राबविण्यात आले.

यात संगमनेर उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कोंबिंग ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान समन्स बजावणी, वॉरंट बजावणी, अटक वॉरंट मधील आरोपी अटक करणे, फरार असलेले आरोपी अटक करणे, त्यांना चेक करणे, तडीपार केलेले गुन्हेगार चेक करणे, अवैध धंद्यांवर कारवाया करणे, रात्रगस्ती दरम्यान संशयास्पदरित्या फिरणाऱ्यांवर कारवाई करणे, मोटार वाहन कायद्याअंतर्गत विविध कारवाई करणे, पोलीस दप्तरी नोंद असलेल्या गुन्हेगारांची तपासणी करणे, विविध मालमत्तेविषयीचे गुन्हे उघड करणे यासाठी विभागात एकाच वेळी हे ऑपरेशन राबविण्यात आले. यापुढे देखील अशाच पद्धतीच्या कारवाया सुरू असल्याचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला सांगितले आहे.

सदरच्या ऑपरेशन दरम्यान खालीलप्रमाणे कारवाया करण्यात आल्या…

➡️ महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत 07 गुन्हे दाखल केले आहे.

▶️ 25 जणांना अटक वॉरंटची बजावणी करण्यात आली.

➡️ 18 जणांना जामीन पात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली.

➡️ 122 जणांना समन्स बजावणी करण्यात आली.

➡️ तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक अधिनियम कायद्यांतर्गत 07 गुन्हे दाखल करण्यात आले.

▶️ पाच ठिकाणी जुगार अड्ड्यांवर रेड करण्यात आल्या.

➡️ गोवंश हत्या बंदी कायद्याअंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

▶️ नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदे अंतर्गत केलेल्या केसेस – 76 कारवाया

➡️ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122/124 खाली 2 गुन्हे दाखल करण्यात आले.

➡️ ड्रंक अँड ड्राईव्हच्या 6 केसेस करण्यात आल्या.

➡️ तर 31 हिस्ट्रीशिटर चेक करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,157
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.