Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर दर्शना पवारच्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश; आरोपी मित्र राहुल हंडोरेच्या मुंबईतून मुसक्या आवळल्या… या कारणासाठी केला खून
गुन्हेगारी

अखेर दर्शना पवारच्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश; आरोपी मित्र राहुल हंडोरेच्या मुंबईतून मुसक्या आवळल्या… या कारणासाठी केला खून

पोलीस तपासात खून प्रकरणाची माहिती येणार समोर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पुणे – कोपरगावच्या दर्शना पवार हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे पोलीस यशस्वी झाले आहे. संशयित आरोपी आणि दर्शनाचा मित्र राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. लग्नाला नकार दिल्याच्या कारणातून ही हत्या झाल्याचे समोर येत आहे.

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एमपीएससी परीक्षेत यश मिळवत रेंज फॉरेस्ट ऑफिसर (RFO) झालेल्या दर्शनाचा मृतदेह काटवणामध्ये आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालानंतर तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीस तपासात ती मित्र राहुल हंडोरे यांच्यासोबत राजगडावर गेली होती. मात्र काही वेळानंतर राहुल हंडोरे हा एकटाच गडावरून खाली आल्याचे निष्पन्न झाले होते. घटनेनंतर तो गायब झाल्याने या हत्याप्रकरणी पोलिसांची संशयाची सुई राहुलच्या दिशेने होती. पोलिसांची पाच पथके त्याच्या मागावर होती. अखेरीस मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.

नासिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील राहुल हंडोरे हा देखील दर्शनासोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. दर्शना आणि त्याची लहानपणापासूनची ओळख होती. दर्शना सोबत विवाह करण्याची त्याची इच्छा होती. मात्र एमपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचा विवाह दुसऱ्या एका मुलासोबत ठरविला होता. त्यानंतर राहुल हंडोरे याने तिच्या घरच्यांना मला वेळ द्या, मी देखील स्पर्धा परीक्षा यशस्वी करतो, असे सांगितले होते. मात्र घरच्यांनी त्याला नकार दिला होता.

दर्शना एका अकॅडमीच्या वतीने आयोजित सत्कारासाठी पुण्यात आली असताना राहुल सोबत राजगडावर गेली होती. त्यानंतर हा प्रकार घडला. दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल बंगालला गेला होता. त्यानंतर तो मुंबईत आला. मुंबईत येताच बुधवारी रात्री पोलिसांनी राहुल याला ताब्यात घेतले असून गुरुवारी त्याला न्यायालयासमोर नेले जाणार असल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

(छायाचित्र सौजन्य दैनिक सकाळ)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,764
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.