Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ बस पेटली, २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू
अपघात

समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ बस पेटली, २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू

समृद्धी मार्गावर भीषण अपघाताची मालिका सुरूच
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

बुलढाणा – महत्त्वकांक्षी आणि ड्रीम प्रोजेक्ट ठरलेल्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला भीषण अपघात झाला. रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झालेल्या बसणे अचानक पेट घेतला. यात २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. चालक, वाहकासह ८ प्रवासी खिडक्या तोडून सुखरूप बाहेर पडले. उर्वरित २५ प्रवाशांचा मात्र होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या या अपघातग्रस्त बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे प्रवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकावरी लोखंडी पोलला धडकली. यानंतर बस पलटी झाली. बसचा दरवाजा पलटी झालेल्या गाडीखाली आल्याने कोणालाही बाहेर पडता येत नव्हते. आणि त्यानंतर डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला.

या दरम्यान चालक, वाहकासह काही प्रवासी गाडीच्या काचा फोडून बाहेर आले. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जे लोक बचावले आहेत, त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जे लोक काचेची खिडकी हाताने फोडून बाहेर निघू शकले त्यांचा जीव वाचला आहे.

अपघात स्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बसमधून २५ मृतदेह बाहेर काढले आहेत. जे मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले आहेत, त्यांची ओळख पटवणे अडचणीचे होत आहे.

अपघात प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समृद्धी महामार्गावरील मानवी त्रुटींमुळे अपघात घडत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासूनच अपघाताची मालिका सुरू आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात झाल्याचे वारंवार समोर आले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी वारंवार विरोधकांनी केली. सरकारने आता तरी या मागणीचा विचार करावा.

दरम्यान थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपघात स्थळी भेट देऊन पाहणी करणार आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 682
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.