Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविणाऱ्या दोघा भामट्यांना नागरिकांनी पकडले
गुन्हेगारी

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविणाऱ्या दोघा भामट्यांना नागरिकांनी पकडले

स्नॅचिंगचे गुन्हे पुन्हा सुरू; शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/07/2023Updated:05/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेहरू गार्डन जवळील औषध दुकानामध्ये औषध घेण्याच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने औषध विक्रेत्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत जोडीदारासह पळ काढला. महिलेने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवत या दोघा भामट्यांना पाठलाग करत पकडल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

या संदर्भात औषध विक्रेत्या महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघा दागिने चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्शन सोमनाथ सोनसळे (वय 32 वर्ष, रा. वार्ड नं. 3, सावता रोड, श्रीरामपूर) व लखन विजय माळवे (वय 32 वर्षे, रा. वार्ड नंबर 7, लबडे वस्ती, अशोक टॉकीजच्या मागे, श्रीरामपूर) अशी या दोघा दागिने चोरांची नावे आहे.

औषध खरेदी करण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून औषध दुकानात आलेल्या भामट्याने दुकानातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढत सोबतच्या जोडीदाराच्या दुचाकीवरून पळ काढला. महिलेने आरडाओरडा केल्याने काही लोकांनी दागिने चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या तावडीतून निसटलेल्या दोघा भामट्यांनी दुचाकी भरधाव नेत असतानाच नेहरू गार्डन जवळील शबरी हॉटेल जवळ सतर्क नागरिकांनी त्यांना पकडले.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे महिलेच्या काळातील मंगळसूत्र आढळून आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या शिवसेना (ठाकरे) शहर प्रमुख अमर कतारी यांनी लागलीच पोलिसांना याची माहिती देत या दोघा दागिने चोरांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान सुभाष जनार्दन अभंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दर्शन सोमनाथ सोनसळे (वय 32 वर्ष, रा. वार्ड नं. 3, सावता रोड, श्रीरामपूर) व लखन विजय माळवे (वय 32 वर्षे, रा. वार्ड नंबर 7, लबडे वस्ती, अशोक टॉकीजच्या मागे, श्रीरामपूर) अशी या दोघा भामट्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले पल्सर मोटरसायकल देखील ताब्यात घेतली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 909
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अकोले तालुक्यातील चांदगिरवाडी (एकदरा) येथे जमिनीच्या वादातून पती-पत्नीवर कोयता,…

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.