Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » २५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या राहात्याच्या अभिलेखपालास एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले
गुन्हेगारी

२५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या राहात्याच्या अभिलेखपालास एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले

लाचखोर विकास दुशिंग यांच्या विरोधात गुन्हा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यामध्ये जमिनीचा नकाशा आणि अहवाल सादर करण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या राहाता भूमी अभिलेख कार्यालयातील अभिलेखपालास एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

विकास सूर्यभान दुशिंग (वय ५१ वर्ष, रा. शारदानगर, कोपरगाव) असे या लाचखोर अभिलेखपालाचे नाव आहे. एसीबीच्या अहमदनगर युनिटने सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई केली.

कोल्हार बुद्रुक, ता. राहाता, जि. अहमदनगर येथील तक्रारदाराने यासंदर्भात एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बुधवारी लाचखोर अधिकाऱ्यास पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. यात २५ हजार रुपयांची लाच घेताना भूमी अभिलेखचा वर्ग ३ चा अधिकारी विकास दुशिंग अलगत जाळ्यात अडकला.

तक्रारदाराने २०१७ मध्ये राहाता तालुक्यातील बाभळेश्वर बुद्रुक येथे गट क्रमांक व उपविभाग ६५ मध्ये १ हेक्टर ५२ आर शेती क्षेत्र विकत घेतले होते. सदर क्षेत्राची तक्रारदार यांनी खाजगी मोजणी केली असता ३२ आर क्षेत्र कमी भरले होते. त्यामुळे तक्रारदाराने सदर क्षेत्राची मोजणी होणेकरिता २०२२ मध्ये मा. दिवाणी न्यायालय, राहाता येथे अर्ज केला होता.

त्यानुसार मा. दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा क्र. १५१/२०२२ चालू होता. सदर दाव्यामध्ये मा. न्यायालयाने दिनांक ०४/०२/२०२३ रोजीच्या आदेशात उप अधीक्षक, भूमी अभिलेख, राहाता यांना सदर जमिनीचा नकाशा व रिपोर्ट दि. १०/०३/२०२३ पावेतो सादर करण्यास आदेशीत केले होते. त्यानुसार तक्रारदाराने वेळोवेळी भूमिअभिलेख कार्यालयात जात दुशिंग यांना नकाशा व रिपोर्ट तयार करून मा. न्यायालायत लवकर सादर करा, या बाबत विनंती केली होती.

दि. २०/०६/२०२३ रोजी दुशिंग यांनी नकाशा व रिपोर्ट तयार केला होता. परंतु कोर्टात पाठविला नव्हता, म्हणून तक्रारदाराने दि. ०२/०७/२०२३ रोजी दुशिंग यांना भेटून नकाशा व रिपोर्ट न्यायालयात पाठविण्याची विनंती केली असता दुशिंग यांनी तक्रारदाराकडे त्यांच्या बाजूने नकाशा व रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची लाच मागणी केली होती.

त्यामुळे तक्रारदाराने यासंदर्भात अहमदनगरच्या लाच लुचपत विभागाशी संपर्क साधत बुधवारी तक्रार नोंदवली होती.

लाच लुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक दुशिंग याने न्यायालयात रिपोर्ट सादर करण्यासाठी पंचासमक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, पोलिस अंमलदार रविंद्र निमसे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल हरुन शेख यांच्या पथकाने विकास दुशिंग याला तक्रारदाराकडून पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 653
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अकोले तालुक्यातील चांदगिरवाडी (एकदरा) येथे जमिनीच्या वादातून पती-पत्नीवर कोयता,…

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.