महाराष्ट्र संवाद न्यूज
गेल्या वर्षभरात लाचखोरीने कळस घातल्याचे दिसून येत असून लाचखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. अनेक छोटे-मोठे लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकत असताना पोलीस उपनिरीक्षकाला 15 हजाराची लाच घेताना पकडण्यात आले आहे.
लाचखोरी करणाऱ्या या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव गणपत महादू काकड असे असून ते नाशिक रोड पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. एसीबीने गुरुवारी दुपारी नाशिक रोड पोलीस ठाण्यात ही कारवाई केली. दररोज लाचखोरीच्या घटना समोर येत आहेत.
पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक काकड याने तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम पंधरा हजार रुपये ठरली. तक्रारदाराकडून पंधरा हजार रुपये स्वीकारत असताना गुरुवारी दुपारी नाशिक रोड पोलीस ठाण्यात एसीबीने पोलीस उपनिरीक्षक काकड याला रंगेहाथ पकडले. या प्रकारामुळे नाशिक पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

