Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

July 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नव्या वाळू धोरणाच्या अंमलबजावणीतील अडचणी प्राधान्याने सोडविण्याचे महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
प्रशासन

नव्या वाळू धोरणाच्या अंमलबजावणीतील अडचणी प्राधान्याने सोडविण्याचे महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

सुधारित वाळू / रेती धोरणासंदर्भात विखे पाटलांनी घेतली मंत्रालयात बैठक
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 6, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – राज्यात सुधारित वाळू / रेती धोरण तयार करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात. जेणेकरून जनतेला स्वस्त दरात वाळू उपलब्ध होईल. तसेच अन्य संबंधित विभागांशी समन्वय ठेवत जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल या दृष्टीने आवश्यक ती कृती तातडीने करावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सुधारित वाळू धोरणासंदर्भात सद्य:स्थितीचा विभागनिहाय आढावा घेण्यासाठी गुरुवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, सुधारित वाळू / रेती धोरणामुळे लोकांना प्रती ब्रास ६०० रुपये एवढ्या स्वस्त दराने वाळू मिळाली पाहिजे. अनधिकृत वाळू उपसा आणि अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे. असा या नव्या धोरणाचा उद्देश आहे. या धोरणामुळे महसूल स्वरूपात स्वामित्व धन (रॉयल्टी) म्हणून वर्षाला जी रक्कम मिळत होती, ती आज महिन्याला मिळत आहे. सामान्य लोकांना या धोरणाचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यातील डेपोची तपासणी करून तत्काळ इतर सर्व वाळू डेपो कार्यान्वित झाले पाहिजेत, असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. रेती घाट चालू होण्यासाठी पर्यावरण विभागाच्या अनुमती अभावी काही घाट प्रलंबित आहेत. त्याबाबत तातडीने कार्यवाही करून रेती घाट चालू करण्यात यावे.

काही ठिकाणी जलसंपदा विभागाच्या अडचणी किंवा अधीक्षक अभियंता सहकार्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून अडचणी दूर कराव्यात. तसेच अनधिकृतरित्या वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

याबाबत पुन्हा आढावा घेण्यासाठी 14 जुलैला बैठक घेण्यात येणार असल्याचेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 608
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

या कारणासाठी संगमनेरच्या ‘हॉटेल रंगीला पंजाब’चा परवाना ३० दिवसांसाठी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कडक कारवाई

July 4, 2026

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

By अनंत पांगारकरJuly 22, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : दिल्ली येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर…

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

July 22, 2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.