महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – वयात येण्यापूर्वीच दोन महिने अगोदर अल्पवयीन मुलीला कायदेशीर रखवालीतून फुस लावून पळवून नेणाऱ्या सारोळे पठार येथील सतीश हरिभाऊ फटांगरे यांच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे हा प्रकार घडला. आरोपी सतीश फटांगरे याने फिर्यादीच्या अल्पवयीन नातीस कशाचे तरी आमिष दाखवून फिर्यादीच्या राहत्या घरातून गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पळवून नेले, अशा आशयाची तक्रार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल वायाळ तपास करत आहे.

