Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तृतीयपंथीयांच्या वेषात दरोड्याच्या तयारीतील टोळी शहर पोलिसांनी पकडली
गुन्हेगारी

तृतीयपंथीयांच्या वेषात दरोड्याच्या तयारीतील टोळी शहर पोलिसांनी पकडली

गुन्ह्याच्या नव्या पद्धतीचा होणार उलगडा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/07/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शहर पोलिसांच्या नव्या टीमची लक्षवेधी कामगिरी

परजिल्ह्यातील टोळीकडून दरोड्याच्या साहित्यासह सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल ताब्यात

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस दलात केलेल्या खांदेपालटानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. तृतीयपंथीयांच्या वेषात दरोड्याच्या तयारीतील सहा जणांची टोळी पकडण्यास शहर पोलिसांना यश आले. शहर पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे.

संजय मारुती शिंदे (वय 25 वर्षे रा. चिसखेड, ता. भोताळा, जि. बुलढाणा), ओंकार शंकर शेगर (वय 23 वर्षे रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, सुनिल बाबुराव सावंत (वय 32 वर्षे रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, राजेश शंकर शेगर (वय 25 वर्षे रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, साजन शिवलाल चव्हाण (वय 25 वर्षे रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा व किशोर महादेव इंगळे (वय 21 वर्षे रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर तालुक्यामध्ये चोऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. दुचाकी चोऱ्या तर नित्याच्याच झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशावरून शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी हिस्ट्रीशिटर चेक करणे, टु प्लस मधील आरोपींच्या वास्तव्याबाबत माहिती घेणे, नाकाबंदी, पेट्रोलींग करणे अश्या प्रकारच्या समांतर कारवाया चालु केल्या.

याशिवाय पोलीस स्टेशनच्या दप्तरी नसलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी सापळा रचुन चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खाडे, पोलीस नाईक विजय पवार, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, रोहीदास शिरसाठ, अविनाश बर्डे, हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार, अजित कुऱ्हे, अतुल उंडे यांचा समावेश होता. शुक्रवारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास भूमी अभिलेख कार्यालयाजवळ पावबाकी रस्त्यावर हे पथक नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करत होते.

या दरम्यान नाकाबंदीच्या कर्मचाऱ्यांना हुलकावणी देत एक शेवरलेट कारचालक कार घेऊन जात असल्याचे निदर्शनास आल्याने पथकातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत त्याला पकडले. कारची तपासणी केली असता त्यामध्ये प्रथमदर्शनी दोन महिलांसह सहा जण आढळून आले. तसेच कारमध्ये असलेल्या संशयितांकडे लाकडी दांडके, लोखंडी टॉमी, गज, लोखंडी कडे, साडी, मिरची पूड रोख रक्कम असा मुद्देमाल आढळून आला. पथकाने कारसहा जणांना पकडत त्यांच्याकडून 2,83,150 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

पकडलेल्या संशयितांची चौकशी केली असता त्यातील दोन्ही महिला पुरुष होत्या. तसेच तृतीयपंथीयाचा वेश परिधान करून या टोळीचा महामार्गावर वाहनांवर दरोडा घालण्याचा प्रयत्न असल्याची माहिती चौकशीत समोर आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहे.

पकडलेल्या आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची अधिक चौकशी केली जात आहे. आरोपीकडून परिसरातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,239
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अकोले तालुक्यातील चांदगिरवाडी (एकदरा) येथे जमिनीच्या वादातून पती-पत्नीवर कोयता,…

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.