Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दरोडाच्या तयारीतील आणखी एक टोळी पकडण्यात संगमनेर पोलिसांना यश; कोल्हार-घोटी मार्गावर वाहने अडवून लुटीच्या होते तयारीत
गुन्हेगारी

दरोडाच्या तयारीतील आणखी एक टोळी पकडण्यात संगमनेर पोलिसांना यश; कोल्हार-घोटी मार्गावर वाहने अडवून लुटीच्या होते तयारीत

पोलिसांची दिलासादायक कामगिरी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – कोल्हार घोटी राज्यमार्गावर निर्जन ठिकाणी वाहन अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची पाच जणांची टोळी उघडकीस आणण्यास शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना पकडले असून टोळीचा मोहरक्या अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. पकडलेल्या आरोपींमध्ये तिघा अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. या टोळीकडून पोलिसांनी 1 लाख 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

तृतीय पंथीयांचा वेश परिधान करत राज्य मार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सहा जणांची टोळी तीन दिवसांपूर्वीच पकडण्यात यशस्वी ठरलेल्या शहर पोलिसांना लागोपाठ दुसरे यश मिळाले आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा पोलिसांनी शोध सुरू केल्याची माहिती देण्यात आली.

संगमनेरमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक स्वाती भोर यांच्या सूचनेवरून पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पोलीस दल सतर्क करत त्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. त्याचे परिणाम या दोन्ही कारवाईमधून समोर आले आहे.

शुक्रवारी रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने शनिवारी मध्यरात्री ही कारवाई केली. शनिवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असलेल्या या पथकाला गणपती मंदिराजवळील समनापुर चौफुली येथील श्री गणेश ट्रेडर्स दुकानाच्या दक्षिण बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये आडोशाला अंधारात काही लोक मोटरसायकलवर दबा धरून बसल्याचे आढळून आले. पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करत चौघा जणांना पकडले तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. पथकाने याची माहिती तातडीने नाईट गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी यांना दिली असता माळी देखील पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी पकडलेल्या संशयितांची चौकशी केली असता त्यांची नावे निष्पन्न झाली तसेच हे सर्वजण कोल्हार-घोटी राज्य मार्गावर निर्जन ठिकाणी वाहन अडवून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबले असल्याची कबुली दिली. पकडलेल्या आरोपीकडून पोलिसांनी मोबाईल, नायलॉन रस्सी, दोन दुचाकी, मिरची पावडर, स्क्रू ड्रायव्हर, लाकडी दांडा, लोखंडी गज, गलोर, नकली छऱ्याची पिस्टल आदी दरोड्याचे साहित्य हस्तगत केले आहे.

पोलिसांनी पकडलेले चारही आरोपी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. रवींद्र राधाकिसन डेंगळे (रा. सायखिंडी) हा या टोळीचा मोरक्या असल्याचे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश चंद्रभान गायकवाड (रा. खांडगाव) याला अटक केली असून तिघा अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील काही आरोपींवर चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,397
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अकोले तालुक्यातील चांदगिरवाडी (एकदरा) येथे जमिनीच्या वादातून पती-पत्नीवर कोयता,…

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.