महाराष्ट्र संवाद न्यूज
नाशिक – तक्रारदाराच्या मित्राला पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. पाच लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती तीन लाखाची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह पोलीस नाईक आणि एका खासगी इसमाला अँटी करप्शन च्या पथकाने रंगेहाथ पकडले.
राहुल बाबासाहेब गायकवाड (पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस ठाणे, भुसावळ, जि. जळगाव) पोलीस नाईक तुषार पाटील आणि खासगी इसम ऋषी दुर्गादास शुक्ला (हनुमान वाडी, भुसावळ, जिल्हा जळगाव) अशी तिघा लाचखोरांची नावे आहेत
ही कारवाई नाशिक लाचलुचपच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस हवालदार राजन कदम, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पावरा, पोलीस कॉन्स्टेबल रामदास बारेला, पोलीस हवालदार चालक सुधीर मोरे यांनी केली.
तक्रारदाराच्या मित्राला भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी न करण्यासाठी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. पोलीस नाईक तुषार पाटील यांच्या सांगण्यावरून व प्रोत्साहित केल्यावरून ऋषी शुक्लाने तक्रारदाराकडे या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती तीन लाख रुपयांवर बोलणी निश्चित झाली होती. तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस नाईक तुषार पाटील व खासगी इसम ऋषी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

