Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी महापौर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल… काय आहे प्रकरण
गुन्हेगारी

माजी महापौर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल… काय आहे प्रकरण

सुजित पाटकर यांना यापूर्वीच झाली अटक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – कोविड घोटाळा प्रकरणी कोणाला सोडणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी कालच विधानसभेत दिल्यानंतर आज शनिवारी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे) गटासाठी हा मोठा धक्का असून पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काय आहे आरोप : कोविड सेंटर कथीत घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आग्रापाडा पोलीस ठाण्यात पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल केला असून पेडणेकर महापौर असताना हा घोटाळा झाला होता. कोविड उपचाराच्या औषधांची खरेदी वाढीव दराने करण्यात आली होती. तसेच बॉडीबॅग खरेदीचाही घोटाळा झाला होता. दोन हजार रुपये किमतीची बॉडीबॅग सहा हजार आठशे रुपयांना विकत घेण्यात आली होती. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरून हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सभागृहात मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले होते : सभागृहात कोविड घोटाळ्याचा मुद्दा गाजल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार पाचशे रुपयांची बॉडी बॅग सहा हजार रुपयांना विकत घेतल्याचे सांगितले होते. कोविडमध्ये आपण काम करत होतो, लोक मदत करत होते, ज्यावेळी लोक मरत होते त्यावेळी काही लोक पैसे कमवत होते हे दुर्दैव आहे. यामध्ये जो घोटाळा केला आहे त्यांना बिलकुल सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.

लाईफ लाईन की डेडलाईन हॉस्पिटल : माणसांना मारणार हॉस्पिटल होतं ते. आपल्याच लोकांना कन्ट्रॅक्ट दिलं. ज्यांना अनुभव नाही त्यांना काम दिलं. त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नव्हते पण डॉक्टर असल्याचे दाखवून पैसे कमावले, असा गंभीर आरोप देखील शिंदे यांनी केला होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 816
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.