Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिकमध्ये तहसीलदार एसीबीच्या गळाला; 15 लाखाची लाच घेताना अटक
गुन्हेगारी

नाशिकमध्ये तहसीलदार एसीबीच्या गळाला; 15 लाखाची लाच घेताना अटक

महसूल सप्ताहात नायब तहसीलदारा पाठोपाठ तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

नाशिक – राज्यात एकीकडे महसूलमंत्र्यांच्या संकल्पनेतून प्रथमच महसूल सप्ताह पाळला जात असताना या सप्ताह काळातच नाशिकच्या तहसीलदारांची लाचखोरी समोर आली आहे. तब्बल 15 लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या तहसीलदारास एसीबीने रंगेहात पकडले. नरेशकुमार तुकाराम बहिरम (वय 44 वर्ष, रा. फ्लॅट नंबर 604, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक) असे एसीबीने पकडलेल्या लाचखोर तहसीलदाराचे नाव आहे.

महसूल सप्ताहातच मोठा मासा एसीबीच्या गळाला लागला : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात महसूल विभाग लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी प्रथमच महसूल सप्ताह राबविण्यास सुरुवात केली आहे. या सप्ताहामध्ये महसूलच्या नायब तहसीलदारापाठोपाठ आता तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. दोन दिवसांपूर्वीच वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील नायब तहसीलदार किशोर शेंडे शेतकऱ्याकडून तीन हजार रुपयांची लाज घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला होता त्या पाठोपाठ शनिवारी नाशिकमध्येच लाचखोरी करणारा तहसीलदार एसीबीच्या गळाला लागला आहे.

काय आहे प्रकरण : राजुर बहुला येथील मुरूम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड स्वामीत्वदन जागा भाडे मिळून 1 कोटी 25 लाख 06 हजार 220 रुपये दंड आकारणी करण्याबाबत तहसीलदार बहिरम यांच्या कार्यालयाकडून आदेश आले होते. या आदेशा विरोधात जमीन मालकाने नाशिकच्या प्रांताधिकार्‍यांकडे अपील दाखल केले होते. याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण फेर चौकशीसाठी पुन्हा तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे पाठविण्यात आले होते.

नेमक काय घडलं : मिळकती मधील केलेल्या मुरूम उत्खननाचा त्याच जागेत वापर केल्याचे जमिनीच्या मालकांचे म्हणणे होते. त्यामुळे याबाबत पडताळणी करण्यासाठी तहसीलदार बहिरम यांनी जमिनीच्या मालकांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षणावेळी बोलावले होते. भिंतीवर मात्र जमीन मालक वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी त्यांच्या वतीने तक्रारदारास कायदेशीर कारवाई कामे अधिकार पत्र दिले होते.

तहसीलदारांनी केली लाचेची मागणी : तक्रारदार स्थळनिरीक्षणावेळी तहसीलदारांना भेटले असता तहसीलदार बहिरम यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. तडजोडीअंती पंधरा लाख रुपयांवर लाचेचा व्यवहार निश्चित झाला. शनिवारी (ता. 5 ऑगस्ट) तक्रारदाराकडून पंधरा लाख रुपये स्वीकारताना एसीबीने तहसीलदारास पकडले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,019
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.