Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » टंचाईत पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे: महसूल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना
प्रशासन

टंचाईत पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे: महसूल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना

संगमनेर येथे टंचाई आढावा बैठक
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 20, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – जिल्ह्यात यंदा दुर्दैवाने अद्यापपर्यंत पुरेशा पाऊस झाला नाही. त्यामुळे टंचाईची परिस्थिती आहे. हे मान्य करावे लागेल. ‌टंचाईत पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण यांनी आज येथे दिल्या.

संगमनेर तालुका टंचाई आढावा बैठक महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, गटविकास अधिकारी‌ अनिल नागणे आदी उपस्थित होते.

गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी संगमनेर पाणी टंचाईचे सादरीकरण केले. संगमनेर मध्ये २० सप्टेंबरपर्यंत ३९ टक्के पर्यंत १३७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. ४७ टंचाई गावापैंकी २१ गावांत २५ हजार ७७४ व्यक्तींसाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

विखे पाटील म्हणाले, संगमनेरमध्ये ३८ टक्के पाऊस झाला आहे. आपल्या समोर पिण्याच्या पाण्याचे आवाहन आहे. धरणातील पाणी आपण पिण्यासाठी राखून ठेवले आहे‌‌. भीषण टंचाईला आपण सामोरे जात आहोत. माणसांसोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. चारा उत्पादनाचा आपल्यापुढे प्रश्न आहे. चारा निर्मिती करण्यास आपण प्राधान्य देत आहोत. शेतकऱ्यांनी चारा उत्पादन करावे आपण विकत घेऊ. शेतकऱ्यांना ६ रूपये किलोने मूरघास‌ उत्पादन केले जाणार आहे. तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी यांच्या अहवालावर‌ गावांना टॅंकरने पुरवठा करण्यात येईल.‌ विहिरीत पाणी न टाकता पाण्याच्या टाकीतूनच पाण्याचा पुरवठा करावा. चारा मागणी असेल ती नोंदवावी.

गावकऱ्यांची मागणी आल्यापासून पाच दिवसांत टॅंकर सुरू झाला पाहिजे. जीवन प्राधिकरणाच्या सर्व योजना कार्यान्वित करण्यात याव्या. टॅंकरचे वेळापत्रक तयार करावे. ग्रामसेवक व तलाठ्यांनी हजर राहिले पाहिजे. जनतेला वेळेत सुविधा उपलब्ध करून देणे शासनाचे काम आहे. शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पठार भागात प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी पाहणी दौरे करावेत. पठार भागाचा स्वतः दौरा करून समस्या समजून घेणार असल्याचे ही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महसूल, जिल्हा परिषद, पाणी पुरवठा, बांधकाम, महावितरण या विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 514
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर

June 9, 2026

तुकाराम मुंडेंचा आदेश अन् अहिल्यानगरमध्ये धडक कारवाई! नामांकित ब्रँड्सचे लाखो रुपयांचे अन्नपदार्थ जप्त

June 3, 2026

संगमनेरमधील अवैध कत्तलखान्यांवर नगर परिषद व पोलिसांचा मोठा हातोडा; सात कत्तलखाने केले जमीनदोस्त

June 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

By अनंत पांगारकरJune 10, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अध्यात्मावर बोलणे आणि त्याचा उपदेश करणे सोपे असते, मात्र त्यानुसार…

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.