Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मराठा आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपवलं; आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे! अशा आशयाची चिठ्ठी लिहीत घेतला गळफास, आत्महत्येचे लोन संगमनेरपर्यंत
महाराष्ट्र संवाद विशेष

मराठा आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपवलं; आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे! अशा आशयाची चिठ्ठी लिहीत घेतला गळफास, आत्महत्येचे लोन संगमनेरपर्यंत

आणखी किती बळी घेतल्यानंतर सरकार आरक्षणाचा निर्णय घेणार?
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/10/2023Updated:31/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवकांना आत्महत्या करू नका अशी कळकळीची विनंती करून देखील राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आत्महत्येचे लोन आता संगमनेरपर्यंत येऊन धडकले आहे. आंदोलकांना भेटण्यासाठी आलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना “विखे पाटील परत जा, परत जा” या आंदोलकांच्या निदर्शनाचा सामना करावा लागल्यानंतर आता संगमनेरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रकार समोर आला आहे.

संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये सागर भाऊसाहेब वाळे (वय 25 वर्ष) या तरुणाने गळफास घेऊन मंगळवारी (31 सप्टेंबर) पहाटे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर वाळे याने घराच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आत्महत्या केली. याच शेडमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एका वहीमध्ये लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर वाळे या तरुणाने सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबासमवेत जेवण केल्यानंतर सर्वजण झोपले होते. मंगळवारी सागर हा घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सागर याने आत्महत्या करण्यापूर्वी एका वहीमध्ये लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की,”आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. एक मराठा लाख मराठा. आपला लाडका सागर मराठा.” असा उल्लेख त्याने या चिठ्ठीमध्ये केला आहे.

मराठा आरक्षणाचा विषय राज्यकर्त्यांच्या वेळ काढूपणामुळे दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. आरक्षणासंदर्भातील आंदोलनाला एकीकडे हिंसक वळण लागत असतानाच आता दुसरीकडे राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्यांचे सत्र देखील सुरू झाले आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने विविध पातळ्यांवर जोर धरला आहे. आंदोलनामध्ये शासकीय मालमत्तांचे नुकसान होऊ लागल्याने बीड, धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,449
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक ३…

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.