Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बातमी मागची बातमी— दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणाचे नवे कनेक्शन | पतसंस्थेतून दिल्या जाणाऱ्या २४० कोटीच्या देणगीच्या ‘या’ व्यवहारात भाऊसाहेब कुटेला मिळणार होते कमिशन! ‘या’ महाराजांच्या वैयक्तिक खात्यावर केले कोटीत व्यवहार
गुन्हेगारी

बातमी मागची बातमी— दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणाचे नवे कनेक्शन | पतसंस्थेतून दिल्या जाणाऱ्या २४० कोटीच्या देणगीच्या ‘या’ व्यवहारात भाऊसाहेब कुटेला मिळणार होते कमिशन! ‘या’ महाराजांच्या वैयक्तिक खात्यावर केले कोटीत व्यवहार

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/02/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अनंत पांगारकर @ ७५८८६००९५०

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या ठेवींचा गैरवापर करत तब्बल ८१ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करणाऱ्या भाऊसाहेब कुटेचा नवा कारनामा समोर आला आहे. पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या औरंगाबादच्या चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांच्या सोबत मोठे आर्थिक व्यवहार असल्याचे समोर येत आहे.

चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांचा ‘श्रीकृष्ण आश्रम ट्रस्ट’ या नावाने पैठण औरंगाबाद येथे आश्रम आहे. कुटे याच्या अधिपत्याखाली असलेल्या दूधगंगा पतसंस्थेकडून सुदर्शन महाराज यांच्या या ट्रस्टला धर्मप्रसार करण्यासाठी २४० कोटी रुपये देणगी रूपाने देण्याचे ठरले. या संबंधीचा २४ नोव्हेंबर २०१८ रोजी एक करारनामा देखील झाला. धर्मप्रसारासाठी दिल्या जाणाऱ्या या रकमेपोटी महाराजांकडून कुटेला काही कोटी रुपयांचा कमिशन रूपात मलिदा मिळणार होता, असे देखील बोलले जात आहे. या सर्व व्यवहारांमध्ये आणि करारामध्ये दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळसह आणखी काही लोकांनी मध्यस्थाची भूमिका बजावली. लोणीच्याही एका मध्यस्थीची भूमिका यात महत्त्वपूर्ण ठरली.

करारनाम्यानंतर महाराजांच्या नावाने पतसंस्थेत वैयक्तिक खाते उघडण्यात आले. हे खाते उघडण्यासाठी महाराजांकडून कोणताही अर्ज किंवा केवायसी कागदपत्रे घेण्यात आली नाही. त्यानंतर या वैयक्तिक बँक खात्यावर पतसंस्थेच्या माध्यमातून २ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम या खात्यावर वर्ग करण्यात आली. करारात ठरल्यानुसार या रकमा पुन्हा रोखीने व आरटीजीएसने वेगवेगळ्या नावाने संक्रमित करण्यात आल्याचे बोलले जाते.

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील ८१ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा हा संगमनेरच्या सहकारी पतसंस्था विश्वातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा म्हणून गणला जात आहे. मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटेसह बहुतांशी आरोपी अद्यापही फरार असून या आरोपींचा शोध घेण्यात अहमदनगर पोलीस यंत्रणा आणि आर्थिक गुन्हे शाखा सपशेल अपयशी ठरली आहे.

एकीकडे या प्रकरणात अटक टाळण्यासाठी सर्वच आरोपींकडून एकेक करत संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल झाले असताना दुसरीकडे आर्थिक गुन्हे शाखेला हे प्रतिष्ठित गुंड का सापडू शकत नाहीत? यांना कोणता राजकीय व प्रशासकीय आश्रय मिळत आहे? असा प्रश्न ठेविदारांमध्ये तसेच सहकारातील जाणकारांमध्ये निर्माण झाला आहे.

या अनुषंगाने पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे आणि या आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या औरंगाबादच्या चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांच्यासोबत असलेले आर्थिक व्यवहारदेखील चर्चिले जात आहे. संस्थेतील गैरव्यवहाराला या नवीन प्रकाराची देखील किनार लाभल्याने या महाराजांना आणखी काही ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अशाच प्रकारे ‘फंडिंग’ होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

महाराजांसोबत हे आर्थिक व्यवहार कुटे याच्या सांगण्यावरून पतसंस्थेचा व्यवस्थापक आणि पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी भाऊसाहेब गुंजाळ याच्यासह काहीजणांनी केले. या प्रकरणातील आरोपी असलेल्या महाराजांसोबत कुटे आणि व्यवस्थापक गुंजाळ याचे आर्थिक व्यवहार समोर येऊ लागल्याने दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरण नव्या वळणावर येऊन ठेपले असल्याचे दिसते. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसा तपास करतात याकडे सहकारातील जाणकरांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,655
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र…

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.