राजुर (अकोले) – भरधाव आयशर आणि मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तिचा तरुणांचा मृत्यू झाला. अपघातातील तिघेही मृत युवक अकोले तालुक्यातील मवेशी येथील आहेत.
प्रथमेश नामदेव किरवे, प्रवीण रामा भांगरे व विलास रामा कवठे असे अपघातातील मृत झालेल्या तरुणांची नावे असल्याची माहिती समजली असून गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील राजुर येथे ही दुर्घटना घडली.
अपघातातील तिघेही तरुण एम.एच. १७ सीयु ९४८१ या दुचाकीवरून अकोलेहून आपल्या गावाकडे मवेशी येथे परतत होते. राजुर स्मशानभूमी जवळ दुचाकी स्वारांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या आयशरशी समोरासमोर जोराची धडक झाली. झालेल्या या भीषण अपघातात या तिघाही तरुणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती संगमनेर-अकोलेचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी “महाराष्ट्र संवाद न्यूज”ला दिली.
दरम्यान अपघातातील तिघा तरुणांना उपचारासाठी अकोले येथील रुग्णालयात आणण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला तिघा तरुणांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


