Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सुरत ते दक्षिणेतील राज्य व पुणे ते छत्रपती संभाजीनगर रस्ता महाराष्ट्राचे भविष्य बदलविणारा ठरेल… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
विकास

सुरत ते दक्षिणेतील राज्य व पुणे ते छत्रपती संभाजीनगर रस्ता महाराष्ट्राचे भविष्य बदलविणारा ठरेल… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अहमदनगर मध्ये
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/02/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहमदनगर, दि. २६ फेब्रुवारी
८० हजार कोटी रुपयांचा सुरत ते दक्षिणेतील राज्यांना जोडणारा नवीन रस्ता व पुणे ते छत्रपती संभाजी नगर रस्ता महाराष्ट्राचे भविष्य बदलविणारा रस्ता ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
अहमदनगर शहरातील द्वारका लॉन्स येथे ९६१ कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर शहर बाह्यवळण रस्ता, ९८० कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर-मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी पॅकेज (एक) अहमदनगर ते घोगरगाव, व पॅकेज (दोन) घोगरगाव ते चापडगाव या १०३२ कोटी रुपये किंमतीच्या रस्त्यांचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नॅशनल हायवेचे संजय जयस्वाल, संतोष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

Advt
Advt

मंत्री गडकरी म्हणाले, सुरत ते दक्षिण भागाला जोडणारा नवीन रस्ता तयार करण्यात येत आहे. राज्यातील पाच जिल्ह्यातुन हा रस्ता जात असुन त्याची लांबी ४८२ किलोमीटर एवढी आहे. अहमदनगर जिल्ह्यातुन १४१ किलोमीटर हा रस्ता जात आहे. त्यासाठी १०९५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येत आहे. तसेच पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा रस्ताही नव्याने तयार करण्यात येत असुन या रस्त्यामुळे केवळ दोन तासांमध्ये छत्रपती संभाजीनगरला पोहोचता येणार आहे. या दोनही रस्त्यांमुळे अहमदनगरच्या विकासाला अधिक चालना मिळेल.
जिल्ह्यात ८६९ किलोमीटरचे नॅशनल हायवेचे जाळे… उद्योग आणि व्यापार क्षेत्राच्या विकासासाठी उत्तम रस्ते, दळणवळणाची साधने, वीज व पाणी आदी बाबींची आवश्यकता असते. पूर्वीच्या काळात जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची लांबी केवळ २०२ किलोमीटर एवढीच होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातुन गेल्या १० वर्षात जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे वाढविण्यावर भर देत नव्याने ८६९ किलोमीटर लांबी वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात १२ हजार कोटी रुपयांची २१ कामे प्रस्तावित करण्यात आली, त्यापैकी ११ कामे पुर्ण करण्यात आली असुन ९ कामे प्रगतीपथावर आहे. येणाऱ्या काळात ही कामे जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय वाढीस लागण्यास अतिशय उपयुक्त ठरतील.
जिल्ह्यात नवीन १४२० कोटी रुपयांच्या रस्त्यांना मान्यता… अहमदनगर जिल्ह्याचा चौफेर विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. ४०० कोटी रुपये किंमतीचा माळशेज घाट, आणेघाट, अहमदनगर बायपास, खरवडी कासार जंक्शन सिमेंट काँक्रीटीकरण, ६७० कोटी रुपयांच्या अहमदनगर ते सबलखेड, आष्टी व चिंचपूर तसेच ३५० कोटी रुपयांचा नांदूर शिंगोटे ते कोल्हार या नवीन रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे.
ग्रीन हायड्रोजनसाठी साखर कारखानदारांनी पुढाकार घ्यावा… ग्रीन हायड्रोजन हीच भविष्यातील टेक्नॉलॉजी आहे. बायोमास्कपासुन मिथेन व मिथेनपासुन हायड्रोजन तयार करण्यात येणार आहे. या हायड्रोजनवर विविध कारखाने, केमिकल इंडस्ट्री, रेल्वे, ट्रक, बसेस तसेच विमानेसुद्धा यावर चालणार आहेत. त्यामुळे साखर कारखानदारांनी ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,094
डॉक्टर सुजय विखे नितीन गडकरी रस्ते
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

संगमनेरातील प्रमुख रस्त्यांना स्व. कासट, परदेशी व केसेकर यांची नावे देण्याची महायुतीची मागणी

25/02/2026

संगमनेर तालुक्याला १०.५० कोटींचा निधी; दोन मोठ्या पुलांचे काम मार्गी – आमदार अमोल खताळ

18/12/2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.