Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अमित पंडीत आणि दिलीप गांधी… व्यक्ति नव्हे विकृती; स्वतःचे पोट भरलेले असताना दुसऱ्याच्या ताटातील ओढून घेण्याची किळसवाणी वृती…. अर्बन बँक बचाव समितीच्या राजेंद्र गांधींची समाज माध्यमातील व्हायरल पोस्ट
गुन्हेगारी

अमित पंडीत आणि दिलीप गांधी… व्यक्ति नव्हे विकृती; स्वतःचे पोट भरलेले असताना दुसऱ्याच्या ताटातील ओढून घेण्याची किळसवाणी वृती…. अर्बन बँक बचाव समितीच्या राजेंद्र गांधींची समाज माध्यमातील व्हायरल पोस्ट

३३ कोटीचे १६ कोटी घ्या, मी लगेचच पैसे भरतो इती अमित पंडित
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार दि. २६ मार्च, अहमदनगर

नगर अर्बन बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या बहुचर्चित आर्थिक घोटाळा प्रकरणी समाज माध्यमामध्ये यातील आरोपी दिलीप गांधी आणि संगमनेर मधील उद्योजक अमित पंडित यांच्या बद्दल वक्तव्य करणारी बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे या पोस्टमध्ये…

एक अमृतवाहीनी बँकेचा चेअरमन तर दुसरा नगर अर्बन बँकेचा चेअरमन, बँकींग कायदे नियम सगळे चांगलेच माहीत असलेल्या. परंतु त्या नियमांचा गैरफायदा कसा घ्यायचा याकडे लक्ष…

अमित पंडीतने कॉसमॉस बँकेचे ९ कोटीचे कर्ज काढले व थकविले. कर्ज जाणीवपुर्क थकवायचे व नंतर बँकांना ब्लँक मेल करायचे मला एकरकमी सवलत द्या तरच मी पैसे भरतो अशी भाषा वापरायची.

दिलीप गांधी नगर अर्बन बँकेला मल्टीस्टेट दर्जा घेणेचा डाव यशस्वी झालेमुळे कायद्याची कुठलीच भिती नसलेली राजकीय व्यक्ति..

अमित पंडीतशी मैत्री मग काय दोघांचे ठरले कॉसमॉस बँकेला एक रकमी परतफेडमध्ये लूटायचे व कॉसमॉस बँकेचे पैसे नगर अर्बन बँकेचे पैशाने फेडायचे व ९ कोटी घेणेऐवजी थेट ३३ कोटी घ्यायचे (पोलीस तपासात समोर आलेला आकडा) अगदी बायका पोरांचे नावावर कर्जे दाखवायची… आणि आपआपसात वाटून घ्यायची 

भारी भारी गाड्या वापरायच्या छान छोकीत राहयचे रोजचा हजारो रूपयांचा अलिशान खर्च…

दिलीप गांधी देखील त्याच विकृतीचे बायका पोरांचे नांवावर मोठे मोठे कर्ज काढून रायसोनी व पटवर्धन पतसंस्था बंद पाडली. इतर अनेक बँका, पतसंस्था अडचणीमध्ये आणल्या.

या बँका पतसंस्थामधील पैसे कोणाचे आहेत तर कोणी पित्याने मुलीचे लग्नाची सोय म्हणजे पै-पै जमा केलेली तर कोणी वृद्धापकाळासाठी दवाखान्याची सोय, दोन वेळचे चटणी भाकरीची तजवीज करायची म्हणून पोटाला चिमटा काढून अर्ध पोटी राहून जमविलेले पैसे..

नालायक विकृत लोक असे पैसे लूटून मौज मजा करतात. राजकीय पोळी भाजून घेतात. समविचारी लोकांची भ्रष्टाचारी टोळी बनवायची तिला संचालक मंडळ असे गोंडस नांव द्यायचे. आता नगर अर्बन बँक बंद पडली अमित पंडीत अटक झाला तरी तो काय म्हणतो ३३ कोटीचे १६ कोटी घ्या, मी लगेचच पैसे भरतो.

बँकेचे ठेवीदार दोन वर्षापासून उन्हातान्हात आंदोलन करत आहेत. रंडकुंडीला आले आहेत, असे असताना या विकृत लोकांनी पैसे परत केले नाही. आता अटक झाले नंतर म्हणतो आहे १६ कोटी घ्यायचे तर घ्या. अशा विकृतीना आम्ही तर विरोध करत राहणार. ज्यांना अशा विकृती आदर्श वाटतात त्यांनी स्वतःचे संस्कार तपासावे.

राजेंद्र गांधी, बँक बचाव समिती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,796
अमित पंडित नगर अर्बन बँक राजेंद्र गांधी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.