Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अभय कोणाचे? स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न केल्याने चौकशीचे विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश
महाराष्ट्र संवाद विशेष

अभय कोणाचे? स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न केल्याने चौकशीचे विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली होती तक्रार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/04/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार दि. ६ एप्रिल, अहमदनगर 

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, मात्र बदल्या होऊन देखील वर्षभराचा कालावधी उलटूनही या कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अद्यापही कार्यमुक्त न केल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिले आहेत.

अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी या संदर्भात पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या विरोधात विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केली होती. शेख यांनी केलेली तक्रार गंभीर स्वरूपाचे असल्याने यासंदर्भात नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल सात दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहे. बदली होऊन देखील या सतरा कर्मचाऱ्यांना पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेत ठेवण्यामागे नेमके पाणी कोठे मुरते असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बदल्या होऊन देखील हाताखालील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणाऱ्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या विरोधात शेख यांनी पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. शेख यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलीस महानिरीक्षकांनी हे आदेश दिले आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस कर्मचारी दर्जाच्या ९२५ व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक के चालक पोलीस शिपाई दर्जाच्या ५९ कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश ३० एप्रिल २०२३ रोजी दिले होते. यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील ३१ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यातील १७ कर्मचाऱ्यांना एक वर्षाचा कालावधी उलटून देखील कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देखील दिलेली नाही असे असताना देखील वरिष्ठांच्या आदेशाचा हवामान करत गुन्हे शाखेचे निरीक्षक आहेर यांनी या कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेत कार्यरत ठेवले आहे. याशिवाय सायबर सेलमधील अनेक कर्मचाऱ्यांना कामाच्या सोयीसाठी स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत ठेवले आहे. सायबर पोलीस ठाणे हा स्वतंत्र विभाग असून तो स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत येत नसताना देखील पोलीस अधीक्षकांनी त्यांच्याकडील आदेश क्र. कक्ष-१(१)असि-आस्था/बदली नेमणूक/४९४६/२०२३ दि.०३/०४/२०२३ च्या आदेशान्वये सायबर पोलीस ठाणे अहमदनगर येथे पोलीस निरीक्षक पदावरुन स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे नवीन नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे सायबर पोलीस

ठाण्याचे अतिरिक्त कामकाज सुध्दा देण्यात आलेले आहे. सदरची बाब संयुक्तीक नसून त्याचे कारण सायबर पोलीस ठाणे येथे स्वतत्र पोलीस निरिक्षक पद मंजुर असताना त्या ठिकाणी नवीन पोलीस निरीक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही.

पोलीस निरीक्षक दर्जाचे अनेक पोलीस निरीक्षक पोलीस नियंत्रण कक्षात उपलब्ध असताना किंवा इतर अतिरिक्त पोलीस निरीक्षक उपलब्ध असूनही नवीन अधिकाऱ्याची नेमणूक न करता आहेर यांच्याकडे या शाखेचा गेल्या वर्षभरापासून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या आस्थापना सूचीवर दोन पोलीस निरीक्षकांची पदे मंजूर असताना देखील केवळ एका पोलीस निरीक्षकाचे पद भरण्यात आले आहे. यासाठी देखील शेख ऑगस्ट २०२१ पासून पाठपुरावा करत असून अद्यापही यावर कोणतेही कार्यवाही झालेली नाही. राज्यात क्षेत्रफळाने मोठा असलेल्या या जिल्ह्यात १४ तालुक्यांचा समावेश आहे. ७ महसूल विभाग असून ज्या बाबींचा विचार करता या शाखेत दोन पोलीस निरीक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. स्थानिक गुन्हे शाखेत आणखी एका पोलीस निरीक्षकासह सायबर सेलमध्ये देखील स्वतंत्र पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्याची तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी शेख यांनी आपल्या तक्रारीत केली होती.

स्थानिक गुन्हे शाखा सातत्याने चर्चेत…

स्थानिक गुन्हे शाखा हे पोलिस दलातील एक विशेष चर्चेतील खाते आहे. या खात्यातील अधिकारी कर्मचारी जिल्ह्यात कोणत्याही पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कारवाई करत असून या कारवाया सातत्याने वादाच्या भोवऱ्यात देखील सापडत आहे. मोठ्या प्रमाणात एलसीबी कारवाई करत असली तरी यातील बहुतांशी कारवाया या परस्पर दडपल्या जात असल्याचे आरोप देखील या शाखेतील कर्मचाऱ्यांवर नेहमी होतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना व या शाखेला नेमके अभय कोणाचे असा प्रश्न देखील वारंवार उपस्थित होत असतो.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,018
पोलीस बदल्या स्थानिक गुन्हे शाखा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्या…

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.