Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उद्योजक ‘अमित पंडित’सह या १० आरोपीविरुद्ध ८००० पानांचे नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र!
गुन्हेगारी

उद्योजक ‘अमित पंडित’सह या १० आरोपीविरुद्ध ८००० पानांचे नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र!

२९१ कोटीच्या घोटाळ्यात १०५ आरोपींचा समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/04/2024Updated:10/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि. १० एप्रिल

नगर अर्बन बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या संचालक, अधिकारी व कर्जदार यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती उपाधीक्षक अमोल भारती यांनी दिली. संगमनेरचा बडा कर्जदार आरोपी व सध्या अटकेत असलेल्या अमित पंडित यांच्यासह दहा जणांचा यामध्ये समावेश आहे.

सुमारे आठ हजार पानांच्या या दोषारोप पत्रात अटक केलेल्या आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे आर्थिक व्यवहाराची माहिती आणि फॉरेन्सिक अहवालाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. ९० दिवसांच्या मुदतीच्या आत हे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

नगर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात या कर्ज फसवणूक प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून आर्थिक गुन्हे शाखेने या संपूर्ण घोटाळ्याचे फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले. तब्बल २९१ कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात तब्बल १०५ जणांवर फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यापैकी दहा जणांना आत्तापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यात संगमनेरमधील अमित पंडित याचा देखील समावेश आहे.

या घोटाळ्याप्रकरणी दिवसेंदिवस नवी माहिती समोर येत आहे. फॉरेन्सिक अहवालात देखील आरोपी विरोधात गंभीर स्वरूपाचे आक्षेप नोंदविण्यात आले. बँकेतील कर्ज प्रकरणांमध्ये कर्जदारांकडून कर्जाच्या रकमेच्या गैरवापर, कर्जाच्या रकमेतून जुन्या कर्जाच्या रकमा भरणे, काही रक्कम संचालक अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय बँकेच्या शाखेअंतर्गत व्यवहारासाठी असलेल्या खात्यांमधून कर्जदारांच्या खात्यात रकमा देखील वर्ग झाल्याचे तपासात समोर आले.

न्यायालयात दोषारोप दाखल झालेल्या १० आरोपींमध्ये यांचा आहे समावेश…

कर्जदार अमित वल्लभराय पंडित, संचालक मनेष दशरथ साठे, अनिल चंदुलाल कोठारी, अशोक माधवलाल कटारिया, सीए शंकर घनश्यामदास अंदानी, शाखाधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील, राजेंद्र शांतीलाल लुणीया, अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक मनोज वसंतलाल फिरोदिया, कर्जदार प्रवीण सुरेश लहारे, व अविनाश प्रभाकर वैकर.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,632
अमित पंडित नगर अर्बन बँक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.