Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणुकीआधी भरारी पथकाच्या हाती पैशाचं घबाड, करोडो रुपये आढळले
गुन्हेगारी

निवडणुकीआधी भरारी पथकाच्या हाती पैशाचं घबाड, करोडो रुपये आढळले

पैसे कशासाठी वापरले जाणार होते याचा शोध घेण्याचे काम सुरू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि.१ मे

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या भरारी पथकाच्या हाती निवडणुकीआधीच मंगळवारी मोठ घबाड लागलं आहे. मुंबईत भरारी पथकाने केलेल्या दोन मोठ्या कारवाया केल्या आहे. सायनमध्ये केलेल्या कारवाईत एका कारमधून कोट्यावधी रुपये जप्त केले. तर आदल्या दिवशी सोमवारी दुपारी दादरपूर्व भागात शिंदेवाडी परिसरातून लाखो रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे.

देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. राजकीय नेते मंडळी प्रचारसभा, रॅलीत व्यस्त आहेत. अशातच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. ३० एप्रिल) निवडणूक भरारी पथकाला सायन परिसरातील एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने कारवाई करत कारमधून तब्बल १ कोटी ८७ लाख ८० हजार रुपये जप्त केले आहेत.

भरारी पथकाने या कारवाईमध्ये करोडो रुपयांसह वाहन आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून त्यांच्या चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सायन पोलीस आणि मुंबईच्या निवडणूक भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता इतके पैसे नेमके कशासाठी वापरण्यात येणार होते. जर का ते निवडणुकीसाठी वापरण्यात येणार होते तर ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.

सोमवारी केली दादरमध्ये कारवाई…

सोमवारी (ता. २९ एप्रिल) दादर पूर्व येथील शिंदेवाडी परिसरात नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यावेळी अनेक गाड्यांची तपासणी केली जात होती. त्यात एका पांढऱ्या रंगाच्या कारची तपासणी केली असता पोलिसांना जवळपास १ लाख ८० हजार रुपयांची रोकड सापडली. निवडणूक भरारी पथकाने भोईवाडा पोलिसांच्या मदतीने ही रोकड जप्त केली. या रोकडबाबत चालकाची चौकशी केली असता, त्याच्याकडे त्यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे आढळली नाही.

भांडुपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड जप्त…

भांडूप येथील सोनापूर सिग्नलवरील वाहनात शनिवारी २७ एप्रिल रोजी मध्यरात्री तीन ते साडे तीन कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. ही रोकड रक्कम सध्या भांडूप पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये आयकर विभागाचे पथक दाखल होत त्यांनी जप्त केलेल्या रोकडची मोजणी केली. आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेली गाडी एटीएमचे पैसे वाहतूक करण्याऱ्या गाडीसारखी होती. परंतु, गाडीतील ही रक्कम कुठे जात होती, ती रक्कम कोणाची आहे, यासंदर्भात काहीच उत्तरे गाडी चालकाने दिली नाही, त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,265
आचारसंहिता भरारी पथक कारवाई लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.