Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » व्ही-आर बॉक्स डोळ्याला लावत घरी बसून फिरता येणार मतदान केंद्रामध्ये, स्वीप समितीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्रांतिकारी प्रयोगाचे देशाने केले कौतुक
महाराष्ट्र संवाद विशेष

व्ही-आर बॉक्स डोळ्याला लावत घरी बसून फिरता येणार मतदान केंद्रामध्ये, स्वीप समितीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्रांतिकारी प्रयोगाचे देशाने केले कौतुक

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 5, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहमदनगर दि. ५ मे 

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशांनुसार अहमदनगर व शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हा मतदार दूत डॉ. अमोल बागुल यांच्या संकल्पनेतून मतदानाला जाण्याअगोदरच मतदान केंद्राच्या आतील रचना व मतदान प्रक्रियेचा क्रम समजण्यास सुलभ व्हावा म्हणून व्ही आर बॉक्स डोळ्याला लावत घरी बसून मतदान केंद्रामध्ये फिरता येणार आहे.

अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या मतदान प्रक्रियेत व्हर्चुअल रियालिटी म्हणजे आभासी वास्तविकता तंत्रज्ञानाच्या प्रयोगाचे राज्य व देश पातळीवर कौतुक होत आहे.

मतदान केंद्राचा एक मिनिटाचा थ्रीडी व्हिडिओ गुगल मायक्रोसॉफ्ट व ॲपल टीचर डॉ. बागुल यांनी तयार केला असून तो मोबाईलमध्ये लावून व्ही आर बॉक्स व गिअरच्या माध्यमातून आपण बसल्या जागी मतदान केंद्राच्या आतील प्रवेश, मतदान अधिकारी क्रमांक एक, दोन, तीन व त्यांची कार्य तसेच वोटिंग कंपार्टमेंट, व्हीव्हीपॅट मशीन व निर्गमन प्रवेशद्वार आदी मतदानाच्या क्रमिक प्रक्रिया लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना जणू मतदान केंद्रातच आपण उभे आहोत की काय या पद्धतीने पाहता येणार आहेत.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य मतदारांना मतदानाची प्रक्रिया सहज सोपी सुलभ होऊन मतदान टक्केवारीत वाढ व्हावी म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्यावतीने पुण्याच्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीत झालेल्या स्वीप नोडल अधिकारी राज्यस्तरीय परिषद व प्रशिक्षण कार्यशाळेत संतोष अजमेरा – संचालक (स्वीप-भारत निवडणूक आयोग), आराधना शर्मा – वरिष्ठ सल्लागार – स्वीप, एस.चोक्कलिंगम (मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र ), किरण कुलकर्णी – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, शरद दळवी – उप मुख्य निवडणूक अधिकारी व राज्यभरातील स्वीप नोडल अधिकारी यांच्यासमोर तसेच अहमदनगरमध्ये शक्ती सिंग, ममता सिंग, (निवडणूक निरीक्षक – खर्च), अजय कुमार बिष्ट (निवडणूक निरीक्षक – सामान्य), एम. व्ही.जया गौरी (निवडणूक निरीक्षक – पोलीस), बाळासाहेब कोळेकर (अपर जिल्हाधिकारी), राकेश ओला (जिल्हा पोलीस अधीक्षक), आशिष येरेकर (मुख्य कार्यकारी अधिकारी – जि. प.) यांच्या स्वीप आढावा बैठकीत अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी) यांनी “व्ही आर बॉक्स मधून मतदान केंद्राचे दर्शन ” हे प्रात्यक्षिक सादर केले.

भारतातील सर्वात मोठ्या स्वीपमंडपम कक्षामध्ये जिल्ह्यातील निवडक स्विफ्ट कक्षांमध्ये देखील हे उपकरण नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

उपक्रमासाठी राहुल पाटील (उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी), मीना शिवगुंडे (स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी), आकाश दरेकर (स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी), प्रदीप पाटील (तहसीलदार-निवडणूक), बाळासाहेब बुगे (उपशिक्षणाधिकारी), प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार) व सर्व स्वीप समिती सदस्य आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 540
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

By अनंत पांगारकरJune 12, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​मुंबई | विशेष प्रतिनिधी: राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध…

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.