Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बचाव कार्यात बुडून मृत झालेल्या शहिदांच्या नातेवाईकांना मदत करणार; पालकमंत्री विखे पाटलांनी शहीद जवानांना शासकीय इतमामात दिली मानवंदना
महाराष्ट्र संवाद विशेष

बचाव कार्यात बुडून मृत झालेल्या शहिदांच्या नातेवाईकांना मदत करणार; पालकमंत्री विखे पाटलांनी शहीद जवानांना शासकीय इतमामात दिली मानवंदना

नगर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, दि. २३ मे

अकोले तालुक्यातील सुगावमध्ये पाण्यात बुडालेल्या तरुणांच्या शोधासाठी धुळ्याहून बोलवण्यात आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) पथकाची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शहीद झालेल्या या तिन्ही जवानांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय इतमामात मानवंदना दिली. तसेच शहीद जवानांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली.

पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा आणि चालक वैभव सुनील वाघ अशी अशी बचाव कार्यावेळी पाण्यात बुडून शहीद झालेल्या व पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार असे बचावलेल्या एसडीआरएफच्या जवानांची नावे आहे.

संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह पोलीस आणि महसूलचे अधिकारी कर्मचारी मदत कार्यात रात्रीपासूनच उपस्थित होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच गुरुवारी सकाळीच राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, स्थानिक अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

पाठोपाठ राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह महसुल व प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. दुपारी राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील घटनास्थळी आले.

शहीद जवानांच्या सहकाऱ्यांचे अधिकाऱ्यांनी केले सांत्वन

मंत्री विखे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या हस्ते शहीद जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी पोलीस दलाने शासकीय इतमामात या शहिदांना मानवंदना दिली. ज्यावेळी शोकाकुल झालेल्या जवानांच्या नातेवाईक आणि सहकाऱ्यांना आपल्या भावना आवरणे कठीण जात होते. मंत्री विखे यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांचे सांत्वन केले.

प्रवरेच्या पाण्यात बुडालेल्या अन्य दोन व्यक्तींचा शोध घेण्याचे मदत कार्य अद्यापही सुरूच होते. दरम्यान यावेळी विखे यांनी सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह बंद करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. याच कारणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांची देखील त्यांनी यावेळी भेट घेतली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,298
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.