Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था आर्थिक घोटाळ्यातील आरोपी कमिशनच्या बदल्यात छत्रपती संभाजीनगरच्या सुदर्शन महाराजांना कुठून देणार होते २४० कोटी, पतसंस्था लुटीसोबत कमिशनखोरीचा आरोपींचा नवा धंदा
पत्रकारिता

दूधगंगा पतसंस्था आर्थिक घोटाळ्यातील आरोपी कमिशनच्या बदल्यात छत्रपती संभाजीनगरच्या सुदर्शन महाराजांना कुठून देणार होते २४० कोटी, पतसंस्था लुटीसोबत कमिशनखोरीचा आरोपींचा नवा धंदा

बातमी मागची बातमी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/06/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आरोपींच्या २४० कोटीच्या व्यवहारामुळे महाराजांच्या फंडिंगचे नेमके कनेक्शन काय? 

या आर्थिक व्यवहाराचे कॅनडा, युएसए, हवालासारखे कनेक्शन तर नाही ना?

गुरुवार, २७ जून

दूधगंगा पतसंस्थेत तब्बल ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप असलेल्या आरोपींनी सभासद नसलेल्या चेतन नागराज कपाटे उर्फ सुदर्शन महाराजच्या श्रीकृष्ण आश्रम ट्रस्टला करोडो रुपये देणगीच्या रूपाने मिळवून देण्याचा घाट घातला होता. या अनुषंगाने आरोपी आणि महाराजांमध्ये आर्थिक व्यवहार देखील झाल्याचे बोलले जाते. नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचा त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

बडी राजकीय आसामी असलेल्या भाऊसाहेब कुटेसह दूधगंगा नागरी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्यातील छत्रपती संभाजीनगर येथील चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज एक प्रमुख आरोपी आहे. कपाटे यांच्या विविध बँकेतील बचत व करंट खात्यावरून चेक व आरटीएसद्वारे कोट्यावधी रुपयांच्या मोठ्या रकमा वर्ग झाल्या आहेत. न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर देखील आर्थिक गुन्हे शाखा फरार झालेल्या महाराजांसह मुख्य आरोपीपर्यंत अद्याप पोहोचू शकलेली नाही.

तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या ठेवींवर अतिशय शांत डोक्याने दरोडा घालत या घोटाळ्यातील म्होरक्या भाऊसाहेब कुटे हा तुरुंगाची हवा टाळण्यासाठी अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या नावाखाली आराम करत आहे. या गुन्ह्याच्या माध्यमातून पतसंस्थेतील आरोपी आणि महाराजांचे २४० कोटी रुपयांचे नवे कनेक्शन समोर आले आहे. तर यातील आरोपी चेतन नागराज कपाटे हा दूधगंगा पतसंस्थेचा सभासद अगर खातेदार नसतानादेखील पतसंस्थेमधून आरोपींनी त्याच्या खात्यावर व्यवहार केले आहेत आणि काही रक्कमा देखील स्वीकारल्याही आहेत. या रक्कमा लाखो रुपयांमध्ये आहेत.

कपाटे उर्फ सुदर्शन महाराज याच्या नावाने आरोपींनी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ९३४५ या नंबरचे बचत खाते उघडलेले आहे. सदरचे खाते उघडण्यासाठी व्यवस्थापनाने कपाटे याचा अर्ज किंवा केवायसीची कागदपत्रे घेण्यात आलेली नाहीत. तसेच खाते उघडून त्यावरील व्यवहार खातेदाराच्या सहीशिवाय केलेले असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे लाखो रुपयांचे व्यवहार आरोपींनी संगनमताने केले आहेत की नाहीत आणि ते कोणासाठी केले आहेत, त्याचा लाभ कोणाला मिळाला आणि मिळणार होता याचा देखील तपास सुरू आहे.

या सर्व प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपींनी चेतन नागराज कपाटे उर्फ सुदर्शन महाराज याच्या श्रीकृष्ण आश्रम ट्रस्टला २४० कोटी रुपयांची देणगी मिळवून देण्याकरता नोटरी करारनामा केला असल्याची व त्यापोटी काही मोठ्या रकमांचे चेक देण्यात आल्याची माहिती समोर येत असून हे चेक संबंधित आरोपींना कोट्यावधी रुपयांच्या देणगीच्या बदल्यात कमिशन म्हणून दिले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये लाखो रुपयांचे व्यवहार आरोपींमध्ये झाले असून बँकांमधून एकमेकांच्या नावावर पैसे ट्रान्सफर झाले आहेत.

तपास अधिकाऱ्यांना शोधावी लागणार या प्रश्नांची उत्तरे…

त्यामुळे पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याबरोबरच आता महाराजांसोबतच्या २४० कोटीच्या प्रकरणाची चर्चा देखील सुरू झाली असून या आर्थिक व्यवहाराचे नेमके रहस्य काय आहे? महानुभव पंथाच्या असलेल्या महाराजांचे भक्तगण पंजाबसह अन्य राज्यात आहे. त्यामुळे आरोपी २४० कोटी रुपये महाराजांना कुठून आणि कोणत्या मार्गाने देणार होते. या आर्थिक व्यवहाराचे कॅनडा, युएसए, हवालासारखे कनेक्शन तर नाही ना? अशीदेखील शंका निर्माण झाली आहे. या घोटाळ्यात ट्रान्सफर झालेले पैसे कोणाला मिळाले. मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याचा या प्रकरणाशी नेमका संबंध काय? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आर्थिक गुन्हे शाखेला शोधावी लागणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,609
दूध गंगा पतसंस्था भाऊसाहेब कुटे सुदर्शन महाराज
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.